पुण्यातील ससून रुग्णालयाच्या परिसरातील ‘तो’प्रकार महिला डॉक्टरने आणला समोर

MhLive24 टीम , 25 जुलै  2020 :- पुणे शहरातील ससून रुग्णालयाच्या परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला असल्याचे येथील महिला डॉक्टर मानसी पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून उघड आणला आहे. यात सांगितल्याप्रमाणे, एक रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी धडपड करताना दिसला.

रुग्णालय परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारला असता त्यांना तो रुग्ण बाहेर थांबला असल्याचं सांगत दुर्लक्ष केलं. वास्तविक त्या रुग्णाच्या हातात एक कागद होता आणि त्यावर 22 जुलैचा उल्लेख होता.

त्याला रुग्णालयात अॅडमिट व्हायचं होतं. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही त्याची मदत केली नाही. काही कर्मचाऱ्यांना मदतीसाठी विचारला असता त्यांनी हे आमचं काम नसल्याचं सांगितलं.

Advertisement

संबंधित कर्मचारी आणि स्ट्रेचर उपलब्ध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. संबंधित कर्मचारी आल्यानंतर या रुग्णाला घेऊन जातील, तोपर्यंत तो इथेच राहील, असं सांगत त्यांनी मला तिथून जायला सांगितलं,’

असं म्हणत डॉ. मानसी पवार यांनी ससून रुग्णालय परिसरातील ही घटना सांगितली आहे. तसंच याला जबाबदार कोण? असाही प्रश्न मानसी पवार यांनी उपस्थित केला आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker