मी इथेच बसलोय, सरकार पाडाच; उद्धव ठाकरेंचं ‘ओपन चॅलेंज’

MhLive24 टीम , 24 जुलै  2020 :- ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकारला पाडण्याची गरज नाही. ते आपोआप पडेल, अंतर्विरोधानं पडेल, अशी टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी हा इथे बसलेलोच आहे.

माझं सरकार पाडून दाखवाच,’ असं आव्हानच त्यांनी विरोधकांना दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. सामनासाठी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध करण्यात आला

आहे, या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केल्याचं या टिझरमधून पाहायला मिळतं. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला अनेक मुलाखती दिल्या आहेत.

Advertisement

मात्र, त्या एका पक्षाचे प्रमुख म्हणून होत्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. उद्धव हे सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राज्यातील सरकार चालवत आहेत.

तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारधारांचे असल्यानं हे सरकार किती दिवस टिकणार हा प्रश्न पहिल्या दिवसापासून उपस्थित केला जात आहे. विशेषत: विरोधी पक्ष भाजपकडून याबद्दल सातत्यानं वक्तव्य केली जात आहेत.

हे तीन चाकांचे ‘रिक्षा सरकार’ आहे. हे अमर, अकबर, अँथोनी पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केली जात आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे.

Advertisement

वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी यासाठीच केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही,

हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker