मी तुकाराम मुंढेंच्याच्या पाठीशी; उद्धव ठाकरे म्हणतात…

MhLive24 टीम , 26 जुलै  2020 :- नागपूरमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सतत संघर्ष होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजपा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट तुकाराम मुंढेंविरोधात केंद्राला पत्र लिहिलं होतं. या सर्व घडामोडीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला असं वाटतं की, तुकाराम मुंढे आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे…मी शिस्तीच्याच मागे उभा आहे,

Advertisement

‘ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढेंची पाठराखण केली आहे.एखाद्या अधिकाराच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? काही नियम, कायदे कडकपणाने अमलात आणले हे काही जणांना परवडत नसेल.

पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करु नये,

शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगले आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल, तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरुन चालणार नाही

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker