कोरोनारुग्णाची लूट थांबवण्यासाठी गृहमंत्री आक्रमक; आता करणार ‘असे’ काही

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :- सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने यावर अंकुश ठेवण्यासाठी अनेक पावले उचलली. 

आता मात्र राज्याचे गृहमंत्री आक्रमक झाले असून त्यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ सारखी आकस्मिक भेटीची गुप्त मोहीम राबवून खासगी हॉस्पिटल,

खासगी कोरोना तपासणी लॅब तसेच खासगी प्लाझ्मा लॅबवर करडी नजर ठेवली जाईल. सामान्य नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही,

Advertisement

असे स्पष्ट संकेत दिले आहेत. अनके ठिकाणी रुग्णांची लूट होत असल्याचे पुढे आले आहे. लोकप्रतिनिधी तसेच पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.

अशा वेळी शासकीय नियमाची पायमल्ली करून अतिरिक्ति पैशांची मागणी करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांना मोकळीक दिली जाणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

यासाठी एक टोल फ्री क्रमणक जाहीर केला आहे. पोलीस विभागाचा टोल फ्री क्रमांक १०० आणि व्हाटसअॅप क्रमांक ९८२३३००१०० जाहीर केला आहे.

Advertisement

सामान्य नागरिक दोन्ही क्रमांकावर अडवणूक केल्याची तक्रार नोंदवू शकतील. त्यानंतर संबंधित आस्थापनाला या संदर्भातील जाब विचारला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker