नादुरुस्त रस्त्याच्या समस्येबाबत त्यांनी धाडले राज्यपालांना निवेदन

Mhlive24 टीम, 26 फेब्रुवारी 2021:–  सध्या जिल्ह्याची अवस्था पाहात जिल्हयातील अनेक रस्ते सध्या नादुरुस्त झाले असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान वर्षानुवर्षे देखील या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांमधून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान अशाच एका नादुरुस्त रस्त्याची फिर्याद थेट राज्यपालांच्या दरबारी पाठविण्यात आली आहे. नगर-कोपरगाव रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने या रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच असून आतापर्यंत अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत.

Advertisement

त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सरकारला द्याव्यात, असे निवेदन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले.

दरम्यान राज्यपालांना पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे, नगर-कोपरगाव रस्त्याचे काम व्हावे, यासाठी आम्ही गेल्या ६ वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत.

गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिलेली असून आता या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे, परंतु अजून रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. अपघातामध्ये एका आठवड्यात ३ जण दगावले आहेत.

Advertisement

या रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे. शिर्डीला परराज्यातून येणाऱ्या साईभक्तांनाही या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker