Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मारुती घेऊन आलीय शानदार ऑफरः कार खरेदीवर तुम्हाला मिळेल भरपूर डिस्काउंट

0 14

MHLive24 टीम, 13 जून 2021 :- आपल्याला नवीन कार खरेदी करायची असेल तर ही बातमी आपल्या उपयोगाची आहे. जूनमध्ये मारुती कारवर भारी डिस्काउंट मिळत आहे. मारुतीच्या एस-प्रेसो आणि स्विफ्टसह उर्वरित मॉडेल्सवर विविध फायदे देण्यात येत आहेत.

या ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. या सर्व ऑफर 30 जूनपर्यंत वैध आहेत.

Advertisement

मारुती या महिन्यात सर्व मॉडेल्सवर  3,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूटही देत आहे. कोणत्या कारवर किती ऑफर आहे ते जाणून घ्या.

मारुती ऑल्टो :- या महिन्यात मारुती ऑल्टोवर  41000 रुपयांची बचत करण्याची संधी आहे. यात   20000 रुपयांची  कंज्यूमर ऑफर र, 15000 रुपयांची एक्सचेंज, 3000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आणि 3000 रुपयांच्या अतिरिक्त ऑफरचा समावेश आहे. हे लक्षात घ्या की हे सर्व फायदे केवळ पेट्रोलवर चालणार्‍या ऑल्टोवरच लागू आहेत. सीएनजी व्हेरिएंटवरही तेच फायदे उपलब्ध आहेत. पण कंज्यूमर ऑफर 15,000  रुपये असेल.

Advertisement

मारुति एस-प्रेसो ; – या महिन्यात मारुती एस-प्रेसोवर  41000 रुपयांची बचत करण्याचीही संधी आहे. यात  कंज्यूमर ऑफर 20000 रुपये, 15000 रुपयांची एक्सचेंज, 3000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आणि 3000 रुपयांच्या अतिरिक्त ऑफरचा समावेश आहे. हे सर्व फायदे पेट्रोल आणि सीएनजी प्रकारांवर लागू आहेत. एस-प्रेसोची किंमत 3.78 लाख ते  5.26  लाखांपर्यंत आहे.

मारुती इको ; – जूनमध्ये मारुती इकोवर 31,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. यात  कंज्यूमर ऑफर 10000 रुपय, 15,000 रुपयांची एक्सचेंज, 3000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आणि 3000 रुपयांच्या अतिरिक्त ऑफरचा समावेश आहे. हे सर्व फायदे पेट्रोल आणि सीएनजी प्रकारांवर लागू आहेत. एस-प्रेसोची किंमत 4.08 लाख ते 5.29 लाख पर्यंत आहे.

Advertisement

मारुती सेलेरिओ ; –  या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत मारुती सेलेरिओवर 21,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी देखील आहे. यात 15000 रुपयांचे एक्सचेंज, 3000 रुपयांचे कॉर्पोरेट सूट आणि 3000 रुपयांच्या अतिरिक्त ऑफरचा समावेश आहे. हे सर्व फायदे  स्टैंडर्ड  सेलेरिओ आणि सेलेरिओ एक्स वेरिएंटवर लागू आहेत.

इतर कारवर सूट ; –  तुम्हाला वॅगनआरवर 29,000 रुपये, स्विफ्टवर 51,000 रुपये, डिजायरवर 36000 रुपये, विटारा ब्रेझावर 36000 रुपये आणि   अर्टिगावर 6000 रुपयांची बचत करण्याची संधी आहे.

Advertisement

जास्तीत जास्त बचत स्विफ्टवर होईल. 51000  च्या डिस्काउंट मध्ये 25000 रु ची  कंज्यूमर ऑफर, 20000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत 3000 रुपये आणि फक्त 3000 रुपयांच्या अतिरिक्त ऑफरचा समावेश आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement