सेबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; ‘इतक्या’ जागांची भरती

MhLive24 टीम , 25 जुलै  2020 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.

सेबीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ३१ जुलै २०२० पर्यंत हे अर्ज करता येणारं आहेत.

परंतु यासाठी २९ फेब्रुवारी २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसले पाहिजे. अधिक माहितीसाठी https://bit.ly/2WT88Xs आणि https://bit.ly/3hwyfv3 या संकेतस्थळावर जावे. तसेच https://bit.ly/3fXmkWF या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

Advertisement
  • अशा आहेत जागा
    १) पदाचे नाव : जनरल – ८० जागा
    शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी, अभियांत्रिकी पदवी, सीए/सीएस/ सीएफए आणि कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
    २) पदाचे नाव : लिगल – २८ जागा
    शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी
    ३) पदाचे नाव : इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी – १७ जागा
    शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा कम्पयुटर ॲप्लीकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी
    ४) पदाचे नाव : अभियंता (civil) – ०१ जागा
    शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (civil)
    ५)पदाचे नाव : अभियंता (Electrical) – ०३ जागा
    शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (Electrical)
    ६)पदाचे नाव : रिसर्च – ०४ जागा
    शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी
    ७)पदाचे नाव : ऑफिशियल लॅग्वेज – ०१ जागा
    शैक्षणिक पात्रता : पदवी मध्ये इंग्रजी विषयासह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी मध्ये हिंदी विषयासह संस्कृत, इंग्रजी, इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी
  • 📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबरMhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker