Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:–नागपूर विद्यापीठ व अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रिसेंट अॅडव्हान्सेस इन मटेरियल सायन्स आणि नॅनो टेक्नोलॉजी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत अहमदनगर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सचिन राळेगणकर (पदार्थ विज्ञान विभाग) व प्रा.डॉ.प्रसाद लामरुड (वनस्पतीशास्त्री विभाग) यांच्या शोध निबंधास सर्वोत्तम शोध निबंधाचे प्रथम पुरस्कार मिळाला.
या ई- परिषदेमध्ये भारतासह जर्मनी, रशिया, पोलंड, स्पेन, चीन, सिंगापूर, इजिप्त, दुबई, स्वीडन आदि देशातील 165 च्या पेक्षा अधिक संशोशकांनी सहभागी होऊन आपले सादरीकरण केले होते.
या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचे कौतुक करुन अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ.प्रविण मोरे उपस्थित होते.
प्रा.राळेगणकर व प्रा.लामरुड यांचे उपप्राचार्य डॉ.अरविंद नागवडे, डॉ. बी.एम.गायकर, डॉ. सय्यद रज्जाक, रजिष्टार अरुण बळीद आदिंसह प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर