Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

अखेर आमदार लहू कानडे यांनीही राम मंदिरासाठी दिली ‘इतकी’ वर्गणी !

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:काँग्रेसचे आमदार लहू नाथा कानडे यांनी नुकतीच दि.१५ रोजी आयोध्येतील श्री राम जन्मभुमी तिर्थक्षेत्रासाठी ५१ हजार रूपये वर्गणी दिली असल्याची माहिती समोर आली आहे

Advertisement

त्यांनी या वर्गणीचा धनादेश नेवासा तालुक्यातील देवगडच्या ‘किसनगिरीबाबा देवस्थान’चे बाबा यांच्याकडे सुपुर्द केला असुन बाबांनी त्यांना नारळ दिल्याचे छायाचित्र आहे.

Advertisement

श्रीरामपुर स्टेट बँक शाखेच्या चेकने हि रक्कम दिली असुन पावतीवर अहमदनगर शहरातील निवासाचा पत्ता दिलेला आहे. पावतीवर प्राप्तकर्ता म्हणून उदयकुमार अरूण भणगे यांची स्वाक्षरी आहे.

Advertisement

राममंदिर वर्गणी मागण्यासंदर्भात दिवसांपुर्वी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी केलेले विधान राज्यभरातील वृत्तपत्रांमधे प्रसिध्द झाले होते.

Advertisement

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत. वर्गणी द्या नाही तर तुम्ही देशद्रोही अशी वातावरण निर्मिती करणारे हे नवे खंडणीखोर तयार झाले आहेत,’ असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला होता

Advertisement

दरम्यान त्यांच्या या विधानांनंतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये पडसाद उमटले होते, श्रीरामपूरमध्ये कानडे यांचा भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला होता.व कानडे यांनी माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली होती.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement