Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

बसने चिरडल्याने माजी सरपंचसह अन्य एकाच मृत्यू ! तिघेजण जखमी ; दोघांची प्रकृती गंभीर

0 3

MHLive24 टीम, 28 जून 2021 :- बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकून पुढे एका मंदिराला धडकली.

यावेळी काही दुचाक्या व एका सायकलला चिरडले यात जखमी झालेल्या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरु आहेत.

Advertisement

हि घटना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे घडली. शामराव दगडू लोखंडे, रामचंद्र बुवाजी वाघमोडे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सविस्तर असे की, शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे पुणे – नगर महामार्गावरुन एक बस एका कंपनीच्या कामगारांना सोडून चालली होती.

यावेळी अचानक बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकून पुढे एका मंदिराला धडकली. दरम्यान बसने यावेळी शेजारील काही दुचाक्या व एका सायकलला चिरडले.

Advertisement

या घटनेत कोंढापुरीचे माजी सरपंच शामराव दगडू लोखंडे, रामचंद्र बुवाजी वाघमोडे दोघे (रा. कोंढापुरी ता. शिरुर) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर कुंडलिक गायकवाड, मंगलसिंग पवार दोघे (रा. कोंढापुरी ता. शिरुर) तसेच बसचालक अशोक सुदाम मते (वय २३ रा. ईकोग्रम सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर) हे तिघे जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Advertisement

अधिक तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement