16 कोटींचं इंजेक्शन देऊनही चिमुकलीची मृत्यूशी झुंज अपयशी

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शनची व्यवस्था केल्यानंतरही पुण्यातील वेदिका शिंदे या चिमुकलीची मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. मृत्यूनं तिच्या जगण्याच्या लढाईवर मात केली.

रविवारी संध्याकाळी खेळत असताना वेदिकाला श्वास घेण्यास अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

स्पायनल मस्क्लुअर अॅट्रॉफीचा विकार :- वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्लुअर अॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दुर्मीळ आजारा झाला होता. या आजारावर मात करण्यासाठी वेदिकाला १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज होती. त्यानंतर तिच्या आई- वडिलांनी वेदिकासाठी लोकवर्गणीतून १६ कोटी जमा केले होते.

Advertisement

या पैशातून वेदिकाला जून महिन्यात १६ कोटी रुपयांचं झोलगेन्स्मा इंजेक्शन देण्यात आलं होतं. वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला होता. इतक्या प्रयत्नानंतरही वेदिकाची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आहे.

खा. कोल्हे यांनी केलं होतं ट्वीट :- वेदिकावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही केलं होतं. वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर अमोल कोल्हे यांनी एक ट्वीटही केलं होतं. वेदिकाला इंजेक्शन दिले अन् कष्टाचं चिज झालं! आपल्या भोसरी येथील सौरभ शिंदे यांची ११ महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे. तिला ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १’ हा दुर्मिळ आजार झाला.

त्यानंतर या आजारावरील ‘झोलगेन्स्मा’ या १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी निधी उभारण्यासाठी संघर्ष सुरू झाला. आज ते १६ कोटींचे इंजेक्शन वेदिका हिला दिल्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या आई वडिलांसह आम्हा सर्वांच्या कष्टाचं आज चीज झालं, याचं खरं तर मनाला समाधान वाटलं, असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं होतं.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker