Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:–श्रावणबाळ निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन आदी योजना तत्काळ कमिटी स्थापन करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा.
तसेच आस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आर्थिक मदतीच्या हातभाराची आवश्यकता आहे.
यामुळे शेतकरी अनुदान देखील त्वरित अदा करावे, अन्यथा शेवगाव- पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या घरासमोर निदर्शने करून सर्व वंचित लाभार्थ्यांना घेऊन बेमुदत मुक्काम आंदोलन केले जाईल,
असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी दिला आहे. अनके वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी सकाळी शेवगावच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी कॉम्रेड संजय नांगरे, वैभव शिंदे, भगवान गायकवाड, बापूराव राशीनकर, अशोक नजन, आत्माराम मगर, विश्वास हिवाळे आदींसह योजनांपासून वंचित राहिलेल्या काही नागरिकांच्या सह्या आहेत.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर