CoronaVirus News : राज्यातील शाळा आणि कॉलेजेस केव्हा सुरु होणार? वाचा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

MHLive24 टीम, 23 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत. शाळा आणि महाविद्यालयं पूर्णपणे कधी सुरु होणार याकडे राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे. यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.(CoronaVirus News)

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात काय परिस्थिती आहे, ते पाहून पुढचे पाऊल, उचलण्यात येईल, असे अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन वर्गात बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

याबाबत लवकरच आढावा घेऊन अंतिम निर्णय होईल अशी माहिती अजित पवार यांनी आज दिली.कोरोनाची परिस्थिती काय आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत काय परिस्थिती असेल ते बघायचे. त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो का, यावर चर्चा होईल, असे ते म्हणाले.

तसेच राज्यात आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही लसींचे दोन्ही डोस घेऊन आपलं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावं असं आवाहनही अजित पवारांकडून करण्यात आलं आहे.

लहान मुलांसाठी लस उपलब्ध करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारने लसीला परवानगी दिल्यानंतर शालेय मुलांना लस देण्याचा प्रयत्न अग्रक्रमाने करण्यात येईल. जेणेकरून दिवाळीनंतर शाळा सुरू करणे सोयीचे होईल, अशी मानसिकता सरकारने ठेवली असल्याचंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker