Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:–जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहे.
तसेच नागरिकांनी नियंमाचे पालन करावे असे आवाहन केले आहे, कोरोनाने शहरी भागात पुन्हा एकदा मोठ्या वेगाने हातपाय पसारण्यास सुरूवात केली असून, हाच कोरोना आता ग्रामीण भागात देखील हातपाय पसरू लागला आहे.
नुकतेच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कोरोना सक्रिय झाला आहे. तिसगावसह करंजी गावात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून, यामध्ये करंजीत एका व्यक्तीचा शनिवारी दुदैवी मृत्यू देखील झाला आहे.
त्यामुळे तालुक्यातील सर्वच गावांमधील नागरिकांनी स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून आरोग्य विभागाकडून नागरिकांना मास्क वापरण्याचे सोशल डिस्टन ठेवण्याचे व वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आव्हान करू लागले आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर