Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:– प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात आणि देशव्यापी कोरोना लसीकरणानंतर गेल्या 24 तासात भारतात 10,584 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 78 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 13,255 नवे नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे 1,10,16,434 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 1,47,306 झाली आहे. एकूण 1,07,12,665 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,56,463 पोहचला आहे.
आतापर्यंत देशात 1,17,45,552 नागरिकांचे लसीकरण झाले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 6,78,685 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 21,22, 30,431 चाचण्या घेण्यात आल्या.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर