झिकावर नजर ठेवण्यासाठी केंद्राचे महाराष्ट्रात पथक

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका व्हायरसचा शिरकाव झालाय. पुणे  जिल्ह्यामध्ये या व्हायरसचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील आरोग्य विभाग सध्या हाय अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात एक मल्टी डिसीप्लिनरी टीम पाठवली आहे.

झिका व्हायरसचं नवं संकट दाराशी :- एकीकडे कोरोनाचं संकट अजूनही घोंघावत असताना आता झिका व्हायरसचं नवं संकट दाराशी आलं आहे. झिका विषाणूच्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आणि झिका प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी हे पथक पाठवण्यात आलंय.

काय आहे झिका व्हायरस? :- झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक झाले आहे.

Advertisement

झिका आजाराची चिन्हे व लक्षणे :- झिका आजाराचा अधिशयन कालावधी निश्चितपणे किती आहे, याबद्दल सुस्पष्टता नाही. तथापि, तो काही दिवसांचा असावा असे दिसते. बहुसंख्य रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नसली, तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंगी आजारासारखी असतात.

त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker