Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

ट्रकमधून दारूचे बॉक्स पळवले!

Advertisement

Mhlive24 टीम, 28 फेब्रुवारी 2021:साध्या चोरटे काय काय चोरी करतील याबाबत अंदाज लावणे कठीण आहे. असाच प्रकार नगर-औरंगाबाद रस्त्यावर घडला. यात चोरट्यांनी चक्क ट्रकमध्ये असलेल्या ४० हजार रुपये किमतीचे बिअरच्या बाटल्याचे बॉक्स लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर असे की, नगर-औरंगाबाद रस्त्यावर शिंगवे तुकाई एमआयडीसीजवळ इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर (एमएच १८ एए १७५३) हा मालट्रक थांबलेला होता. अज्ञात चोरट्यांनी या ट्रकमधील टूबर  या बियरचे २० बॉक्स प्रत्येकी ९२ बिअर बाटल्याचे अज्ञात चोरट्याने चोरुन नेले.

Advertisement

या बिअर बाटल्यांची किंमत ४१ हजार रुपये आहे. या प्रकरणी ट्रक चालक रावसाहेब गोरखनाथ दारकुंडे, (रा. रस्तापूर ता. नेवासा) याने सोनई पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात केला असून, पोना तुपे हे पुढील तपास करीत आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement