भाजपनं जाहीर केली मुख्यमंत्र्यांच्या अपयशाची यादी

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं. पवार यांनी केलेलं हे कौतुक भारतीय जनता पक्षाला फारसं रुचलेलं नाही. पवारांनी नेमकं कशासाठी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, असा सवाल करत, भाजपनं मुख्यमंत्र्यांच्या अपयशाची यादीच जाहीर केली आहे.

काय म्हणाले होते पवार? :- ‘अलीकडं महाराष्ट्रावर सतत काहीना काही संकटं येत आहेत. अतिवृष्टीचं संकट मोठं आहे. हजारो घरांमध्ये पाणी शिरलं. होतं नव्हतं ते वाहून गेलं. या संकटावर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली. एकीकडे पूरग्रस्तांची घरं बांधण्याचं आव्हान तर दुसऱ्या बाजूस मुंबईतील कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचललं आहे,’ असं पवार काल म्हणाले होते.

बीडीडी चाळीच्या कामाचा फडणवीस यांनीच केला होता प्रारंभ :- महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत पवारांच्या या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेले दीड वर्ष मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील शाब्दिक खेळ, भावनिक आवाहनं आणि ड्रायव्हिंग हेच जनता पाहत आली. मुख्यमंत्री ठाकरे आता ज्या प्रकल्पांचा प्रारंभ करत आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांनीच सुरू केले आहेत,’ असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

Advertisement

ही आहे अपयशाची यादी :- उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांच्या अपयशी कारकीर्दीची यादीच सादर केली आहे. ‘कोरोनातील अपयश, मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश, ओबीसी आरक्षण अपयश, पूरग्रस्तांना मदतीत अपयश, शेतकऱ्याना मदतीत अपयश…’ अशी ही यादी आहे. ही अपयशाची यादी आणखी वाढू शकते,’ असंही उपाध्ये यांनी पुढं म्हटलं आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker