Mhlive24 टीम, 01 डिसेंबर 2020 :-प्रसिध्द अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार हे अशी जोरदार चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाले आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.
उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला. पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे. विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे.
अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगना सुनावलं होतं. त्यानंतर काही महिन्यातच उर्मिला मातोंडकर यांना खुद्द उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची ऑफर दिली. लोकसभा निवडणूक 2019 च्या रणधुमाळीमध्ये उर्मिला यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
त्यांचा भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला. त्यावेळेस स्थानिक कॉंग्रेस नेते आणि अंतर्गत गटबाजीमुळे आपला पराभव झाल्याचं सांगत त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर सातत्याने त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. आता अखेर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर