मोठी बातमी: माजी मंत्री गिरीश महाजनांच्या वाहनास अपघात; आरोग्य कर्मचारी अत्यवस्थ

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :- पाचोरा तालुक्यातील लोहरी- वरखेडी दरम्यानच्या रस्त्यावर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या कारची व दुचाकीची धडक होऊन

वरखेडी (ता. पाचोरा) प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. माजी मंत्री गिरीश महाजन हे वरखेडी- लोहारी रस्त्याने जामनेरकडे जात असताना

वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी. सी. पवार यांच्या दुचाकीची व कारची धडक झाली. आमदार महाजनांच्या कारने दुचाकीला धडक दिली असे म्हटले जात असले

Advertisement

तरी पवार हे दुचाकीने जात असताना कारच्या मागील बाजूने ते कारवर धडकले व रस्त्यावर खाली पडून जखमी झाल्‍याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

या अपघातात वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी.सी. पवार हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली नसून जखमीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Advertisement

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली. आ. गिरीश महाजन यांनी आपल्या गाडीतूनच जखमी कर्मचार्‍याला पाचोरा येथील खासगी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker