बिग ब्रेकिंग : नारायण राणेंची तब्बेत बिघडली !

MHLive24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती अशी भाषा केल्याने नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथकं चिपळूणकडे रवाना झाली.

त्यातच युवासेना आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत मुंबईतील नारायण राणे यांच्या घराकडे कूच केली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासेनेचे कार्यकर्ते राणेंच्या बंगल्यावर निर्देशने करण्यास रवाना झाली.

दरम्यान नारायण राणेंची तब्बेत बिघडली, बीपी-शुगर वाढली आहे, प्रमोद जठार यांनी अशी माहिती दिली आहे, स्थानिक एसपी आलेत, ते राणेसाहेबांना अटक करत आहेत, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नाही. एस पी म्हणतात आमच्यावर वरुन खूप दबाव आहे. पण आम्ही त्यांना अटक वॉरंट दाखवण्यास सांगत आहोत. त्यांच्याकडे वॉरंटच नाही. जोपर्यंत वॉरंट दाखवत नाहीत, तोपर्यंत कारवाई होऊ देणार नाही, असं प्रमोद जठार यांनी सांगितलं.

Advertisement

राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत.

त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते ते बघू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा इशारा राणेंनी दिला आहे.

त्यामुळे राज्यभरात वातावरण तापलं आहे. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणी राणेंविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलनं सुरू आहेत.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker