Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:–छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पराक्रमी होते. त्यांचा स्वराज्य निर्मितीत मोठा सहभाग होता.
अशा आदर्शवत मावळ्यांच्या वेशभूषा वापरून त्यांचा व समस्थ शिवभक्तांचा अवमान होऊ नये, म्हणून लग्न समारंभात अशी वेशभूषा वापरण्यावर बंदी घालावी, अशी मागणी माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरख गवारे यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे., की महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. महाराजांच्या मावळ्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठा मान आहे.
त्यांच्या वेशभूषेवरूनच मावळे ओळखले जायचे. त्यांचा इतिहास खूप मोठा व महान आहे. सध्या लग्न समारंभात हौसेखातर किंवा खोट्या प्रतिष्ठेपायी मावळ्यांची वेशभूषा परिधान करून कोणत्याही व्यक्तींना मुजरा घालायची पद्धत रुजत आहे,ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे.
लग्न समारंभात मंगल कार्यालये अशा प्रकारे मावळ्यांची वेशभूषा पुरवतात, याची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्राचा सन्मान, शिवाजी महाराजांचा आदर्श आदींचा विचार करून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयांना मावळ्यांची वेशभूषा वापरण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी गवारे यांनी केली आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर