Bal Bothe : रेखा जरे हत्याकांड, आरोपी बाळ बोठे जामीन मिळाल्यास फरार होऊ शकतो…

MHLive24 टीम, 22 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा जामीन नाकारण्यात आला आहे,बदनामी होण्याच्या भितीतून बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

बोठे सध्या पारनेर येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. या गुन्ह्याच्या संदर्भातील सर्व पुरावे पोलिसांनी न्यायालयासमोर आणले आहेत.

जामीन मिळाला तर आरोपी फरार होऊ शकतो तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. बोठे याने रेखा जरेंशी वितुष्ट आल्यानंतर कट रचून शांत डोक्याने त्यांची हत्या घडवून आणली आहे.

Advertisement

खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने शंभरपेक्षा जास्त दिवस तो तेलंगणा राज्यात लपून बसला होता. आरोपीचे वर्तन लक्षात घेत त्याला जामीन देऊ नये, असा युक्तीवार सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. यादव यांनी केला होता.

बोठे याच्यावतीने न्यायालयात ॲड. महेश तवले तर फिर्यादी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील व ॲड. सचिन पटेकर यांनी युक्तीवाद केला होता.

दरम्यान बोठे विरुद्ध नगर शहरात खंडणी आणि विनयभंगाचेही गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांचा तपास सुरू आहे.अटक आरोपी बाळ बोठे हा पारनेर येथील कोठडीत आहे. या न्यायालयीन कोठडीत मोबाइल आढळून आला होता.

Advertisement

जरे खून प्रकरणानंतर त्यापूर्वी घडलेल्या दोन घटनांचे गुन्हेही बोठेविरुद्ध दाखल झाले आहेत. एका महिलेने विनयभंगाची फिर्याद दिली आहे. तर दुसऱ्या महिलेने नोकरी टिकविण्यासाठी खंडणी मागितल्याची तक्रार केली आहे. यानुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker