Take a fresh look at your lifestyle.

चार एकर कोथिंबिरीचा साडेबारा लाखांना लिलाव

0

Mhlive24 टीम, 8 सप्टेंबर 2020 :-   राज्यात एकीकडे कर्जबाजरीपणामुळे आत्महत्या करणारे शेतकरी आहेत तर दुसरीकडं आहे त्या शेतीमध्ये माल पिकवून भरघोस नफा मिळवणारे प्रगत शेतकरी… 

Advertisement

अशाच एका प्रगतशील शेतकऱ्याने चक्क कोथिंबिरीतुन लाखोंचे उत्पन्न कसे मिळवले याची माहिती आपण जाणून घेऊ नाशिक जिल्ह्यातील सिन्नार तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावच्या विनायक हेमाडे यांच्या दर्जेदार उत्पादनाला मिळालेलं उत्पन्न सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहे.

Advertisement

या शेतकऱ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हेमाडे यांना फक्त चार एकर कोथिंबिरीच्या पिकाचा मोबदला हा तब्बल १२ लाख ५१ हजार इतका मिळाला आहे. हेमाडे यांनी आपल्या ४ एकर जमिनीत ४५ किलो धणे पेरले.

Advertisement

सुमारे ४० दिवस पाणी आणि खतांचा योग्य असा पुरवठा केल्यानंतर पीक काढणीस तयार झालं. याच वेळी दापूर येथील भाजीपाला व्यावसायिक शिवाजी दराडे यांनी थेट बांधावर येऊन साडे बारा लाख रुपयांचा सौदा केला.

Advertisement

हेमाडे यांनी केवळ स्वतःचा हिंमतीवर कुठल्याही प्रकारची पुढील बाजारभावाची अपेक्षा न करता कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. या शेतकऱ्याने शेतात केलेल्या लागवडीचा निश्चितच फायदा झाल्यामुळे त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Advertisement

शेतकऱ्याची ही यशोगाथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळालं याचा आनंद व्यक्त केला जात आहे. या यशोगाथेतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

Advertisement
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li