Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

अलका कुबल यांनी आरोप लावणे चुकीचे : प्राजक्ता गायकवाड

Mhlive24 टीम, 5 नोव्हेंबर  2020 :-मी ‘आई माझी काळुबाई’ मालिका सोडली. मला कोणीही काढलेले नाही. मालिकांचे कलाकारच जर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतील

Advertisement

तर येथील वातावरण महिला कलाकारांसाठी सुरक्षित कसे असेल? त्यात अलका कुबल यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीने असे आरोप लावणे चुकीचे आहे. त्यांची भूमिका योग्य नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान असून, त्यांनी आरोप करणे थांबवावे.

Advertisement

माझ्याशी गैरवर्तणूक होत असेल तर मी आवाज उठवणारच, अशा शब्दांत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर दिले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यात आयोजिलेल्या वार्तालापात तिने आपली भूमिका मांडली.

Advertisement

प्राजक्ता हिने एका वाहिनीवरील ‘आई माझी काळुबाई’ मालिका नुकतीच सोडली. तिच्या मालिका सोडण्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. प्राजक्ता सेटवर उशिरा यायची, तिच्यामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागायचे,

Advertisement

तिच्या कामात आईचा हस्तक्षेप असायचा, त्यामुळे तिला मालिकेतून काढून टाकल्याचे मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी माध्यमांत दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. याचे खंडन करत प्राजक्ता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li