Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

अज्ञातवासानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं आणि म्हणाले …

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून झालेले आरोप आणि 15 दिवसाच्या अज्ञातवासानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं. राठोड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

Advertisement

15 दिवसांनंतर पूजा चव्हाण संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांच्यावर झालेले सगळे प्रयत्न फेटाळताना माझं राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

वाचा काय म्हणाले राठोड ?

Advertisement

पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते चुकीचं आहे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारं हे राजकारण आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला.

Advertisement

मी मागासवर्गीय समाजातून आलो आहे. भटक्या विमुक्तांसाठी काम करत आहे. मी ओबीसींचा नेता आहे. पण गेल्या काही दिवसांपासून घाणेरडं राजकारण करून माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. विविध माध्यमांवर माझ्या बाबतीत जे काही दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. जे काही व्हायरल होत आहे. त्यात काही तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला.

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. पोलीसही तपास करत आहेत. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. पण समाजाची आणि माझी वैयक्तित बदनामी करू नका, असंही ते म्हणाले.

Advertisement

मी दहा दिवस कुठेही गेलो नव्हते. जे काही सुरू होतं. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला सावरत होतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. माझी वृद्ध आई आहे. या सर्वांना मी सावरत होतो. मुंबईच्या माझ्या कार्यालयातून माझं काम सुरू होतं.

Advertisement

मी चार वेळा निवडून आलो आहे. गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात आहे. माझ्यावर समाजाचे प्रेम आहे. त्यामुळे अनेक लोक येतात आणि माझ्यासोबत फोटो काढतात. असं सांगत विश्वास ठेवा चौकशीतून सर्व काही बाहेर येईल, असंही त्यांनी सांगितलं.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement