Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

कोरोना डोके वर काढू लागल्याने चिंतेत भर

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:नोव्हेंबर महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत घट झाली असताना नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचा विसर पडला आह. त्यामुळे चिंतेत भर पडत आहे. विदर्भातील काही जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहेत.

Advertisement

आता मुंबई, नाशिक, पुणे ही शहरे पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रसार माध्यमातुन दाखविले जात आहे. नागरिकांचा हलगर्जीपणा यास कारणीभुत ठरत आहे.

Advertisement

कोरोना अदयाप गेला नाही हे शासन वारंवार बजावुन सांगत असताना याकडे दुर्लक्ष केले गेले. त्याचे परीणाम आता नागरिकांनाच सोसावे लागणार आहे.

Advertisement

लॉकडाऊननंतर कोरोनाबाधीतांची घटती संख्या लक्षात घेता शासनाने अनलॉक सुरु केला. हळहळु एक एक गोष्ट खुली करत आठवडे बाजार, मंदिर, मस्जीद यांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली.

Advertisement

आर्थिक चलन फिरावे, नागरिकांची गौरसोय दूर व्हावी, यासाठी बसेस, लोकल सुरु करण्यास परवानगी दिली. हळूहळू सर्व व्यवसाय, उदयोग, धंदे, कंपनी यांचे कामकाज पूर्वदावर येऊ लागले.

Advertisement

शासकीय कार्यालये सुरू करुन नागरिकांना दिलासा दिला. हे सर्व खुले करताना मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याचे पालन मात्र कोणीच केले नाही. अखेर पुन्हा या संकटाने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

पुन्हा मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, मंगल कार्यालयात मर्यादीत व्यक्तींन परवानगी आदी नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे. याबाबत महसूल व पोलीस खात्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Advertisement

सर्वांनी नियमांचे पालन करावे व कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement