Take a fresh look at your lifestyle.

बॉम्ब स्फोटाची धमकी देणारा आरोपी गजाआड

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :- जामनेर शहरात दिनांक १३ रोजी महाराष्ट्र ग्लोबल हॉस्पीटलच्या उद्धाटनासाठी विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जळगांव जिल्ह्यातील खासदार, आमदार, महत्वाचे राजयकीय नेते, इतर डॉक्टर व जनता उपस्थित होती.

Advertisement

त्यावेळी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतांना गिरीष महाजन यांचे स्वीय्य साहाय्यक दिपक लक्ष्मण तायडे यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन करून एक करोड रुपयांकरिता बॉम्ब स्फोटाची धमकी दिली.

Advertisement

याबाबत माहीती मिळताच तात्काळ जिल्हाचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सुरक्षेचा आढावा घेवून त्याठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली.

Advertisement

तसेच धमकी देणाऱ्या विरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे जिल्हा जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव

Advertisement

सायबर क्राईम व स्थानीक गुन्हे शाखा जळगाव व जामनेर पोलीस स्टेशनचे पथक असे नेमण्यात आले. या पथकाने पाचोरा, पिंपळगांव (हरे.), पहुर परिसर पिंजुन काढत संशयित लोकांची विचारपुस करुन तांत्रिक पध्दतीने आरोपींचा शोध घेतला असता,

Advertisement

सदर गुन्ह्यांत आरोपी जामनेरचा असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीसं अटक करण्यात आली असुव अटकेच्या वेळी त्याच्याकडून १३ मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. आरोपी पाचोरा राज्य परीवहन मंडळ डेपो येथे कंडाक्टर म्हणुन काम करतो.

Advertisement

आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस एक दिवसाची कस्टडी रिमांड मिळाली आहे. सदरची कारवाई जळगांव जिल्हाचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी ही कामगिरी केली आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li