Take a fresh look at your lifestyle.

अबब! ‘ह्या’ जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा इशारा

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :- सध्या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. जूनच्या पूर्वार्धात सुरु झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे.

Advertisement

मध्यंतरी थंडावलेला पाऊस सुखावणारा असला तरी पुन्हा वादळाने मागील दोन दिवसात महाराष्ट्रात पुन्हा पावसाने थैमान घातले.

Advertisement

आता महाराष्ट्रावर घोंगावणारे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता गुरुवारी कमी झाली असली तरी हवामान खात्याने पुणे, मुंबई,

Advertisement

ठाणे आणि कोकण किनारपट्टीसह विदर्भातील पाच जिल्ह्यांना शुक्रवारी (ता. 16) पावसाचा “यलो अलर्ट’ दिला आहे.

Advertisement

पुण्या-मुंबईबरोबरच कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा,

Advertisement

नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांमध्येही “यलो अलर्ट’ दिला आहे.

Advertisement

या भागातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मध्य महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग 20 ते 30 प्रतितास किलोमीटर असेल, असेही स्पष्ट केले.

Advertisement

अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्या-मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद,

Advertisement

लातूर, बीड, परभणी, हिंगोली, गोंदिया येथे अतिवृष्टी झाली. तेथील सरासरीपेक्षा 60 टक्‍क्‍यांहून जास्त पाऊस तेथे नोंदला गेला.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li