‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कंपन्यांना जोरदार बूस्ट; यंदा कंपन्यांची बंपर कमाई, जाणून घ्या सविस्तर…

MHLive24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  कोरोनाने देशात चांगलाच धुमाकूळ घातला. यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. मानवाचे कल्चर बदलून गेले. विविध गोष्टींमध्ये बदल झाला तर काहींमध्ये करावा लागला. सुरवातीला नकोसे आणि नवीन वाटणारे बदल आता लोक अंगिकारू लागले आहेत. काही बदलांचे फायदेशीर परिणाम समोर आले आहेत.

यातील एक बदल म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ कल्चर उदयास आले. वर्क फ्रॉम होममुळे आयटी सेवा कंपन्यांसाठी प्रचंड संधी निर्माण झाल्यात. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या मागणीमुळे या कंपन्यांना अधिकाधिक कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत, ज्यामुळे कंपन्यांच्या कमाईतही भरभराट होण्याची शक्यता आहे.

ICRA चे उपाध्यक्ष आणि सेक्टर हेड गौरव जैन यांच्या मते, साथीच्या आजारामुळे वर्क फ्रॉम होम वाढल्याने आयटी सेवा कंपन्यांची मागणी लक्षणीय वाढली. ते त्याच्या सतत वितरणात गुंतलेले आहेत. यामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की, महामारीमुळे कोर मॉर्डनायझेशन, क्‍लाउड मायग्रेशन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा कल वाढत आहे.

Advertisement

यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल बिझनेस मॉडेलकडे वळत आहेत. घरातून कामाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपन्यांना हे करावे लागणार असून, कंपन्यांना याचा फायदा होईल. इक्राच्या अहवालानुसार, उपक्रम आता आभासी मॉडेलकडे वळत आहेत. यामुळे डिजिटल आउटसोर्सिंग सौद्यांमध्ये वाढ झालीय.

याशिवाय फेब्रुवारी 2021 मध्ये अमेरिकेत नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून H-1B शी संबंधित धोकेही कमी झालेत. व्हिसा नियम, वेतन पातळी आणि निवड प्रक्रियेबाबत अमेरिकेत अनेक बदल प्रस्तावित आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker