क्रेडिट कार्ड वापरताना लक्षात ठेवा तुमच्या नकळत आकारले जाणारे ‘हे’ काही चार्जेस, खिसा होऊ शकतो रिकामा

MHLive24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- क्रेडिट कार्ड हा अलीकडे प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग झाला आहे. तसे पाहता क्रेडिट कार्ड ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. खिशात पैसे नसतानाही खरेदी करता येते, खर्च करता येतो. क्रेडिट कार्डचे पैसे एक-दीड महिन्याने भरावे लागतात. मेट्रो शहरांमधून आणि अगदी छोट्या शहरांमध्येही डिजिटल व्यवहार केले जातात.

डेबिट कार्ड आणि डिजिटल पेमेंट अ‍ॅप प्रमाणेच क्रेडिट कार्डची सुरक्षा देखील खूप महत्वाची आहे. परंतु कार्ड वापरताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. बॅंका किंवा बॅंकेचे कर्मचारी ग्राहकांना फ्री क्रेडिट कार्डची ऑफर देत असतात. मात्र याचबरोबर क्रेडिट कार्डसोबत अनेक अटी अन चार्जेस देखील असतात, ज्याची फारशी चर्चा होत नाही. जाणून घेऊयात त्या विषयी

१. अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज :- अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज हे हिडन किंवा छुपे शुल्क नसते. बॅंका या शुल्कासंदर्भात माहिती देतात. हे शुल्क वर्षातून एकदा वसूल केले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट कार्ड हे शुल्क वेगवेगळे असते. काहीवेळेस बॅंका मोफत अॅन्युअल मेंटेनन्स चार्जची सुविधा देतात. म्हणजेच जॉइनिंग फी किंवा अॅन्युअल फीच्या नावाने कोणतेही शुल्क घेतले जात नाही. अर्थात ही सुविधा काही विशिष्ट कालावधीसाठीच असते.

Advertisement

२. कॅश अॅडव्हान्स फी :- तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेचा काही हिस्सा कॅश लिमिटच्या म्हणजे cash advance fee च्या रुपात घेतला जातो. ही रक्कम तुम्ही तुमच्या एटीएममधून काढू शकता. मात्र क्रेडिट कार्डद्वारे कॅश फायदा घेणे किंवा एटीएममधून क्रेडिट कार्डद्वारे कॅश काढणे ही महागडी बाब आहे. कारण तुम्ही जितकी रक्कम काढता त्याच्या २.५ पटीपर्यत रक्कम तुम्हाला बॅंकेला द्यावी लागू शकते.

यात ग्राहकाला कळतदेखील नाही की क्रेडिट कार्डचा वापर करून जसे पैसे काढले तसे व्याज आकारणी सुरू होते. अशा परिस्थितीत व्याजावर सूट मिळत नाही. बहुतांश बॅंका क्रेडिट कार्डचा वापर करून कॅश काढल्यावर १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांचे शुल्कदेखील वसूल करतात.

३. ओव्हर लिमिट फी :- हे शुल्क तुमच्या क्रेडिट कार्डच्या प्रकारावर अवलंबून असते. प्रत्येक क्रेडिट कार्डबरोबर तुम्हाला एक क्रेडिट लिमिट मिळते. त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च करण्याची सुविधा काही बॅंका देतात तर काही बॅंका देत नाहीत. जर एखाद्या क्रेडिट कार्डधारकाने लिमिटपेक्षा अधिक खर्च केला तर बॅंक त्यावर जबरदस्त व्याज आकारतात.

Advertisement

बहुतांश बॅंकांची किमान मर्यादा ५०० रुपये इतकी असते. म्हणजेच किमान ओव्हर लिमिट फी ही ५०० रुपये असू शकते. ही फी तुमच्या क्रेडिट कार्डचा प्रकार आणि बॅंक यावर अवलंबून असते.

४. सरचार्ज :- कधीकधी इंधनासारख्या व्यवहारावर सरचार्ज आकारला जातो. म्हणून जर आपण पेट्रोल किंवा डिझेल भरत असाल तर आपली बँक कोणती फी आकारत आहे का याकडे लक्ष द्या. काही बँकांनी इंधन सरचार्ज माफ केले आहेत. क्रेडिट कार्ड निवडताना, पेट्रोल भरण्यापूर्वी आपल्याला नेहमीच क्रेडिट कार्ड वापरावे लागेल का ते ही लक्षात घ्या.

५. विदेशी व्यवहार :- विदेशी व्यवहारावर देखील शुल्क आकारले जातात. म्हणून परदेशात क्रेडिट कार्ड वापरताना खबरदारी घ्यावी. आपण ते देशांतर्गत वापरत असल्यास, त्याचा आंतरराष्ट्रीय वापर रद्द करा. हे शुल्क खूप जास्त असू शकते.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker