दीड रुपयात काय होतं? करोडपती होता येतं…कस? जाणून घ्या…

MHLive24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-  प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते, पण जे समजूतदारपणा दाखवतात तेच श्रीमंत होऊ शकतात. जर एक सामान्य व्यक्तीने चांगला निर्णय घेतला तर तो सहजपणे लक्षाधीश होऊ शकतो. अशी संधी शेअर बाजार देते. येथे गुंतवणूक करून कोणीही लक्षाधीश होऊ शकतो. असे अनेक शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

अशाच एका शेअरबद्दल जाणून घेऊयात. या कंपनीचे नाव आहे आदिनाथ टेक्सटाइल्स लि. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे जबरदस्त कमाई करत मालामाल झाले आहेत. फक्त साडेसात महिन्यात आदिनाथ टेक्सटाइल्सच्या शेअरने गुंतवणुकांचा दणदणीत परतावा दिला आहे.

१ जानेवारी २०२१ला आदिनाथ टेक्सटाइल्स लि.चा शेअर १.७१ रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. सध्या या शेअरची किंमत २२.६५ रुपये प्रति शेअर इतकी आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे, तेही फार छोट्याशा गुंतवणुकीद्वारे.

Advertisement

काही महिन्यातच १ लाख रुपयांचे १३.२ लाख रुपये करणारा शेअर :- जानेवारी महिन्यात आदिनाथ टेक्सटाइल्स लि.चा शेअर १.७१ रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करत होता. म्हणजेच जवळपास दीड रुपयांच्या जवळपास. १३ ऑगस्टला या शेअरची किंमत २२.६५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर जाऊन पोचली आहे. म्हणजेच साडेसात महिन्यात या कंपनीच्या शेअरने जवळपास ११६१.९९ टक्के परतावा आपल्या गुंतवणुकदारांना दिला आहे.

गुंतवणुकदारांना या कंपनीने छप्परफाड कमाई करून दिली आहे. जानेवारी महिन्यात या शेअरची किंमत जवळपास दीड रुपया असल्याने फार छोट्याशा गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदारांना मोठी जबरदस्त कमाई करता आली आहे. ज्यांनी जानेवारी महिन्यात आणि त्यानंतरही या शेअरमध्ये वेळोवेळी पैसे गुंतवले असतील ते आज कोट्यधीश झाले असतील.

दीपक नाइट्राईट :- दीपक नाइट्राईट हा असा स्टॉक आहे ज्याने लोकांना एकदा गुंतवणूक करून करोडपती बनवले आहे. जर आजपासून फक्त 10 वर्षांपूर्वी कोणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे मूल्य आज 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. आजच्या अगोदर दहा, ऑगस्ट 2011 मध्ये हा शेअर 18.50 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.

Advertisement

तर आज 16 ऑगस्ट रोजी ते 2125 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. अशा प्रकारे, या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या पैशात 10 वर्षांत जवळपास 114 पटीने वाढ झाली आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदाराचे पैसे 10 वर्षातच 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker