व्यवसाय करायचाय पण कर्ज मिळत नाही? नो टेन्शन, फेसबुक देईन तुम्हाला पैसे

MHLive24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- अनेकांना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असतो. परंतु बऱ्याचदा अडचण असते ती म्हणजे पैशांची. बऱ्याचदा आर्थिक बजेट न बसल्याने अनेकांना व्यवसाय सुरु करता येत नाही. परंतु आता हि समस्या चुटकीसरशी सुटणार आहे. हे समस्या तुमचे आवडते फेसबुक सोडवणार आहे. होय, हे खरे आहे.

कारण आता फेसबुकने छोटे आणि मध्यम उद्योजकांना लोन सुविधा सुरु केले आहे. यामुळे या उद्योगांना 5 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हे कर्ज देशभरातील 200 शहरामध्ये उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी फेसबुकने Indifi सोबत करार केला आहे. ही कंपनी MSME ला कर्जवाटप करते.

फेसबुक इंडियाचे व्हीपी आणि एमडी अजित मोहन यांनी हे कर्ज लाँच केले आहे. या कर्जासाठी कोणताही collateral लागणार नाही. कर्ज 5 दिवसांत मंजूर केले जाईल. याचा व्याजदर 17 ते 20 टक्के एवढा असेल. महिला व्यावसायिकांना व्याजदारत 0.2 टक्के सूट दिली जाणार आहे.

Advertisement

लोन मिळविण्यास त्रास होत असलेल्या व्यावसायिकांना कमीत कमी वेळात लोन मिळावे म्हणून ही सोय फेसबुकने केल्याचे त्यांनी सांगितले. मोहन म्हणाले की, या मोहिमेचे लक्ष्य बिझनेस लोन सहज, सोपे बनविणे हा आहे. भारत पहिला देश आहे, जिथे फेसबुकने ही योजना आणली आहे. Ficci चे अध्यक्ष उदय शंकर यांनी सांगितले की, फेसबुकची ही मोहिम प्रशंसेस पात्र आहे.

MSME सेक्‍टर ला पुढे नेण्यासाठी यामुळे मदत मिळेल. ज्या कंपन्या काही तारण ठेवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे कर्ज उपयोगाचे आहे. या कंपन्यांना खेळते भांडवल मिळाले तर त्या विकास करू शकतील. कर्जाला गॅरंटी काही मिळत नसल्याने बँका आणि अन्य कंपन्या त्यांना कर्ज देत नाहीत. ही समस्या दूर होईल.

नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले की, MSME हा देशाच्या विकासाचा कणा आहे. Facebook ची ही मोहिम या विकासाला मदत करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker