टोयोटाकडून अनोखी ऑफर! मका किंवा सोयाबीन द्या अन फॉर्च्यूनर घरी घेऊन जा

MHLive24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-  जपानी ऑटो कंपनी टोयोटा मोटर्सने एक अनोखी पेमेंट सिस्टम सुरू केली आहे. या अंतर्गत, तुम्हाला यापुढे फॉर्च्युनरसाठी रोख पैसे देण्याची गरज भासणार नाही. आता तुम्ही मका आणि सोयाबीन देऊन फॉर्च्युनर घरी घेऊन जाऊ शकता. या विशेष ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

युनिक पेमेंट सिस्टीम सुरू केली :- टोयोटाच्या ब्राझील ऑपरेशनने ही अनोखी पेमेंट सिस्टम सादर केली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीच्या ग्राहकांमध्ये विक्री वाढवण्यासाठी, कंपनीने मका आणि सोयाबीनमध्ये आपल्या निवडक मॉडेल्सचे पेमेंट घेणे सुरू केले आहे.

पेमेंट कसे केले जाईल ? :- टोयोटा ब्राझीलने या योजनेला टोयोटा बार्टर असे नाव दिले आहे. मोटर 1 च्या अहवालानुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कृषी ग्राहकांना मका किंवा सोयाबीन कारच्या किंमतीच्या बरोबरीने द्यावे लागेल. तथापि, सोयाबीन आणि मका या दोन्हीची किंमत कंपनीसाठी समान असेल.

Advertisement

नवीन योजनेमुळे विक्री वाढण्याची अपेक्षा आहे :- टोयोटाचा दावा आहे की ब्राझीलमध्ये त्याची 16% थेट विक्री ग्रामीण किंवा कृषी ग्राहकांकडून आहे. अशा स्थितीत या नवीन योजनेमुळे त्याची विक्री आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

योजनेत नियम आणि अटी देखील :- मका आणि सोयाबीनमध्ये टोयोटाचे पेमेंट स्वीकारणाऱ्या या योजनेतही अटी व शर्ती आहेत. ग्राहकाला कार देण्यापूर्वी कंपनी ती व्यक्ती शेतीसाठी प्रमाणित आहे की नाही याची तपासणी करेल, दुसरे म्हणजे त्याची मका किंवा सोयाबीन सस्टेनबल प्लांटेशन आणि चांगल्या दर्जाचे आहे का हे देखील चेक करेल .

कोणत्या वाहनांवर ऑफर आहे ? :- टोयोटा ब्राझीलची ही स्कीम फक्त काही मॉडेल्सवर उपलब्ध आहे. यामध्ये Hilux पिकअप ट्रक , कोरोला क्रॉस एसयूव्ही किंवा एसडब्ल्यू 4 एसव्हीचा समावेश आहे. SW4 SV हे तेच वाहन आहे जे कंपनी भारतात फॉर्च्यूनर म्हणून विकते.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker