पेट्रोल-डिझेलचे आजचे दर ही वादळापूर्वीची शांतता की खरोखर मिळणार दिलासा?; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

MHLive24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-  मागील काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे.

परंतु सध्या जे दर आहेत ते अत्यंत जास्त असल्याने सर्वच लोक चिंतेमध्ये आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असणारे स्थिर भाव ही वादळापूर्वीची शांतता की खरोखर दिलासा मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे.

जाणून घ्या महानगरांतील आजचे लेटेस्ट रेट

Advertisement

आता दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे.

कोलकातामध्ये आता 1 लिटर पेट्रोलची किंमत 102.08 रुपये आहे. तर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 93.02 रुपये आहे.

आता मुंबईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.

Advertisement

असे ठरवतात किंमत :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? :- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker