नोकरीमधील तुटपुंज्या पगाराला कंटाळला आहात? ‘ह्याची’ लागवड करून शेतीमधून कमवा लाखो रुपये

MHLive24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- असे म्हणतात की खूप पैसे कमवायचे असतील तर नोकरी सोडून व्यवसाय केला पाहिजे. तसा जमाना पण तर स्टार्टअपचा आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीपासून कंटाळला असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही आयडीया देणार आहोत त्याने आजची तरूण पिढी लाखो रुपये कमवू शकते. तुम्ही मनात आणलं तर घर बसल्या लाखो रुपये कमवू शकता.

अनेक उच्चशिक्षित युवकांनी नोकरी सोडून शेतीतून हे सिद्ध करून दाखवलं आहे की, पारंपारिक शेती केल्याने आपण आपलं भविष्य घडवू शकतो. तसं पहायला गेल तर आताची शेती ही तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तंत्रज्ञानातून शेती करत आज अनेक युवक मालामाल झाले आहेत.

पारंपारिक शेतीला चांगला पर्याय :- पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी चिया बिया देखील लागवड करू शकतात, ज्याला आता सर्वाधिक मागणी आहे. खास बाब म्हणजे मागणीबरोबरच त्याचे भावही बाजारात जास्त आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांना चांगला नफा देखील मिळतो. त्यामुळे आपण चिया बियाची लागवड करुन कमी वेळेत चांगला नफा मिळवू शकता.

Advertisement

महागड्या दराने होते विक्री :- अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वेळी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात याचा उल्लेख केला होता. वास्तविक, या बिया 1000 ते 1200 रुपये प्रति किलो दराने ऑनलाईन विकल्या जात आहेत आणि तेही महागड्या दराने शेतकऱ्यांकडून विकत घेतले जात आहे. या बिया फारच लहान दिसतात, ती पांढरी, तपकिरी आणि काळ्या रंगाची असून शरीराला ऊर्जा देण्यासाठी हा एक चांगला ऊर्जा स्त्रोत मानला जातो. हे मुळात मेक्सिकन पीक आहे.

किती आहे कमाई ? :- हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असलेल्या चिया पिकासाठी प्रति 600 ते 700 किलोप्रमाणे भाव मिळतो. एकरी उत्पन्नाचा विचार केला तर 30 हजार रुपयांपर्यंत आहे आणि जर 6 क्विंटल लागवड झाली तर ती सुमारे 90 हजार रुपयांना विकली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही एक एकरावर 60 हजार रुपयांपर्यंत कमाई कराल.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker