मोदी सरकारचा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार; शेतकरी मालामाल होणार

MHLive24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पाम ऑईल मिशनला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यावर एकूण ११ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

देशाच्या एकूण लोकसंख्येत दरवर्षी २.५ कोटींची भर पडते. त्यानुसार खाद्य तेलाच्या विक्रीतही दरवर्षाला ३ ते ३.५ टक्के टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भारत सरकार ६० ते ७० हजार कोटी खर्च करून १.५ कोटी टन खाद्यतेल आयात करत आहे. देशातील लोकसंख्येचा विचार करता दरवर्षी देशात २.५ कोटी टन खाद्य तेलाची गरज भासते.

भारतात कोणते खाद्यतेल सर्वाधिक वापरले जाते? :- भारत सोया आणि पाम तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. खाद्यतेलांमध्ये पाम तेल एकूण आयातीत 40 टक्के आहे, सोयाबीन तेल सुमारे 33 टक्के आहे. अर्जेटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन तेल आयात केले जाते.

Advertisement

सरकार आता काय करणार? शेतकऱ्यांना काय फायदा होणार ? :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत केंद्र सरकार पाम तेलाचे उत्पादन वाढवण्यावर भर देणार आहे. तेलकट बिया असलेल्या वनस्पतींचे उत्पादन भारतात खूप कमी आहे. आता ती मोठ्या प्रमाणात वाढवण्याची योजना तयार करण्यात आलीय, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होऊ शकेल. याआधीही भारताला डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याचे प्रयत्न झालेत.

मोदी सरकार नेमकं काय करणार ? :- राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत मोदी सरकार पाम तेलाचं उत्पादन वाढविण्यावर जोर देणार आहे. भारतात तेलबियांचं संवर्धन खूप कमी प्रमाणात होतं. त्यात वाढ करण्याचा सरकारचा इरादा आहे.

तेलबियांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून सरकार पुढाकार घेणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट होईल यादृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत. याआधी भारतानं डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker