तुमच्या नोकरी मध्ये मिळणाऱ्या सॅलरी स्लिपचे आहे खूप महत्त्व, जाणून घ्या फायद्याच्या 8 गोष्टी

MHLive24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- बदलल्या काळात नोकरीतील सॅलरी स्लिपचे महत्व वाढले आहे. सॅलरी स्लिप म्हणजे वेतन पावती एक महत्वाचे कागदपत्र आहे. जॉब बदलताना नवीन एचआर विभाग याच्यावर जास्त जोर देतो. एका कर्मचार्‍यासाठी हा उत्पन्नाचा कायदेशीर पुरावा आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख असतो.

याचे कोण-कोणते महत्व आहे ते जाणून घेवूयात… स्लिपमध्ये तुम्हाला बेसिक पगाराव्यतिरिक्त इतर कोणते फायदे मिळतात किंवा कोणते कर भरता येतील, याची माहिती दिली जाते, त्यामुळे पे-स्लिपचे महत्त्व समजून घेतल्यास कर वाचवण्यास मदत होऊ शकते.

(1) बेसिक सॅलरी :- सॅलरी स्लिपमध्ये बेसिक सॅलरीचा उल्लेख असतो. PF आणि HRA ची गणना याच्याच आधारावर होते. बेसिक सॅलरीवरच टॅक्स द्यावा लागतो.

Advertisement

(2) हाऊस रेंट अलाऊन्स :- एचआरए बेसिक सॅलरीच्या 50% पर्यंत असू शकतो. तुम्ही भाड्याने राहताना वर्षात जेवढे भाडे देता, त्यातून बेसिक सॅलरीच्या 10% भाग कमी केल्यानंतर जे पैसे वाचतात, तो सुद्धा HRA होऊ शकतो. यावर टॅक्स सुद्धा अवलंबून असतो.

(3) LTA (प्रवासी भत्ता) :- एलटीए करमुक्त आहे, जे कर्मचाऱ्यांना प्रवास खर्चात मदत करते. तुम्ही तुमची मुले, जोडीदार आणि पालकांसोबत सहलीसाठी तो वापरू शकता. वर्षातून एकदा तरी सुट्टीचा प्रवास करून तुम्ही करमुक्तीचा दावा करू शकता. तुम्हाला तुमच्या नियोक्त्यासह तुमच्या प्रवासासंबंधी बिल सादर करणे आवश्यक आहे.

(4) व्यावसायिक कर :- हा कर तुमच्या पगाराच्या आधारे कापला जातो. हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलते. पीटीअंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त 2,500 रुपये कपात करण्याचा नियम आहे. व्यावसायिक कर हा राज्य कर आहे, तर केंद्र सरकारकडून आयकर आकारला जातो. नियोक्ता ही रक्कम कापून राज्य सरकारकडे जमा करतो. तुम्ही या कराचा दावा करू शकता.

Advertisement

(5) बोनस किंवा टार्गेट व्हेरिएबल पे :- कर्मचार्‍याची कामगिरी किती चांगली आहे, यावर टार्गेट व्हेरिएबल पे (टीव्हीपी) दिला जातो. हा पूर्णपणे करपात्र आहे.

(6) कन्व्हिनियन्स अलाऊंस किंवा ट्रॅव्हल अलाऊंस (वाहन भत्ता/प्रवास भत्ता) :- कन्व्हिनियन्स कंपनी तुम्हाला तेव्हा देते जेव्हा तुम्ही कंपनीच्या कामासाठी बाहेर प्रवास करता. हे पैसे इनहँड सॅलरीत जमा करून मिळतात. 1,600 रुपयापर्यंत कन्व्हिनियन्स अलाऊन्सवर टॅक्स द्यावा लागत नाही.

(7) मेडिकल अलाऊन्स :- हा अलाऊन्स मेडिकल कव्हर म्हणून दिला जातो. गरज भासल्यास याचा उपयोग केला जातो. 21,000 रुपयांपर्यंत ESIC साठी काही पैसे कापले तर ते कर्मचार्‍याच्या आरोग्य गरजांसाठी कापले जातात.

Advertisement

(8) भविष्य निर्वाह निधी :- जर तुमच्या कंपनीमध्ये 20 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर ईपीएफ कायदा -1952 अंतर्गत निवृत्ती लाभांचे पालन करणे आवश्यक आहे. पीएफ तुमच्या पगाराच्या 12% आहे, जे तुमच्या पीएफ खात्यात जमा केले जाते. आपण नोकरी सोडल्यास किंवा त्याची गरज असल्यास, व्याजासह पीएफची रक्कम परत केली जाते. पीएफमध्ये तुमच्या पगारातून वजा केलेली रक्कम, तीच रक्कम कंपनीने तुमच्या वतीने तुमच्या पीएफ खात्यात जमा केली आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker