अजब-गजब : 1 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा चमचा, पण तब्बल 2 लाख रुपयांना विकला

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- बऱ्याचदा अशा कथा बाहेर येत राहतात, ज्यात व्यक्तीला नशीबाने असे काहीतरी मिळते, जेणेकरून तो रातोरात श्रीमंत होतो. अलीकडे आणखी एक अशीच घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचे आयुष्य एका रात्रीत बदलले. चमच्याने या माणसाचे नशीब बदलले आहे. होय, या व्यक्तीला हा चमचा 1 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळाला. पण नंतर त्याचा ऑनलाइन लिलाव झाला. अन त्याला लाखो रुपये मिळाले.

90 पैशांत विकत घेतला तुटलेला चमचा :- ‘द सन’च्या वृत्तानुसार, एका व्यक्तीची रस्त्यावरुन जाताना चोरबाजारातील एका चमच्यावर नजर गेली. मात्र, हा चमचा तुटलेला होता. परंतु त्यात त्यांना लक्षात आले की हा चमचा काहीतरी खास आहे. म्हणूनच त्याने हा जुना चमचा 90 पैशांना विकत घेतला.

यानंतर त्या व्यक्तीने या 5 इंचाच्या चमच्याची तपासणी केली, ज्यात ती चांदीची असल्याचे उघड झाले. त्याची रचना 13 व्या शतकातील रोमन युरोपियन शैलीची आहे. त्या माणसाला खात्री पटली की त्याला जॅकपॉट लागला आहे. सदर प्रकरण लंडनमधील आहे.

Advertisement

2 लाख रुपयांना लिलावात विकले :- यानंतर, त्या व्यक्तीने चमच्याची सध्याची किंमतीचा अंदाज लावला, तो सुमारे 52 हजार रुपये निघाला. त्याने या चमच्याची किती किंमत होते, यासाठी ऑनलाईन चाचपणी सुरु केली. त्याने तो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लिलावासाठी ठेवला. दरम्यान, हळूहळू त्याची बोली लिलावात वाढत गेली.

या चमच्याच्या बदल्यात त्याला लाखो रुपये देऊ करण्यात आले. पण शेवटी या चमच्याची बोली 1 लाख 97 हजार रुपयांना अंतिम झाली. कर आणि अतिरिक्त शुल्क जोडून, त्याची किंमत 2 लाख पार केली आहे. जी त्याने खरेदी केलेल्या रकमेपेक्षा 12 हजार पट जास्त होती.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker