स्टेट बँकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त लॉन्च केली ‘ही’ विशेष योजना; जास्त व्याजदर मिळवण्याची संधी

MHLive24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- भारतीय स्टेट बँकेने स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी एक ‍पेशल डिपॉजिट योजना सुरू केली आहे. ज्याला एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट असे नाव देण्यात आले आहे. जे मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. 15 ऑगस्ट रोजी सुरू झालेली योजना 14 सप्टेंबर रोजी संपेल.

या योजनेची संपूर्ण माहिती बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. एसबीआयने ट्वीट करत म्हटले आहे की बँकेने मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींसाठी विशेष लाभ दिले आहेत. जे 14 सप्टेंबर पर्यंत चालू राहील. SBI कडून कोणत्या प्रकारचा लाभ देण्यात आला आहे हे देखील आम्ही याठिकाणी सांगणार आहोत.

एसबीआयच्या या योजनेबद्दल जाणून घेऊयात: 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर पर्यंत तुम्ही एसबीआयच्या प्लॅटिनम योजनेत गुंतवणूक करू शकता. यासाठी, तुम्ही प्‍लेटिन 75 दिवसांसाठी, प्लॅटिनम 525 दिवसांसाठी आणि प्लॅटिनम 2250 दिवसांसाठी घेऊ. तुम्ही या तीन पैकी कोणत्याही मध्ये गुंतवणूक करू शकता.

Advertisement

पात्रता

एनआरई आणि एनआरओ फ‍िक्‍स्‍ड डिपॉजिटसह रिटेल फिक्‍स्‍ड डिपॉजिट (रु. 2 कोटी पेक्षा कमी)
नवीन आणि नूतनीकरणयोग्य ठेवींवर.
मुदत ठेव आणि विशेष मुदत ठेव उत्पादने.
NRE ठेवी फक्त 525 दिवस आणि 2250 दिवसांसाठी.

सामान्य लोकांसाठी एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट व्याज दर :- प्लॅटिनम 75 दिवसांसाठी सध्याचा व्याज दर 3.90 टक्के आहे तर प्रस्तावित व्याज दर 3.95 टक्के ठेवण्यात आला आहे. त्याच वेळी, प्लॅटिनम 525 दिवसांसाठी सध्याचे व्याज दर 5 टक्के आहेत, तर प्रस्तावित व्याजदर 5.10 टक्के ठेवण्यात आले आहेत. प्लॅटिनम 2250 दिवसाच्या योजनेचे सध्याचे दर 5.55 टक्क्यांच्या तुलनेत 5.40 टक्के ठेवण्यात आले आहेत.

Advertisement

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय प्लॅटिनम ठेव व्याज दर 

प्लॅटिनम 75-दिवस योजनेसाठी सध्याचे व्याज दर 4.40 टक्के आणि प्रस्तावित दर 4.45 टक्के ठेवण्यात आले आहेत.
प्लॅटिनम 525 दिवसांच्या योजनेसाठी सध्याचे व्याज दर 5.50 टक्के आणि प्रस्तावित दर 5.60 टक्के ठेवण्यात आले आहेत.
प्लॅटिनम 2250 दिवसांच्या योजनेसाठी 6.20 टक्के (एसबीआय वेकेअर स्कीम अंतर्गत लागू व्याज दर) ठेवण्यात आले आहे.

व्याज कसे मिळेल: मुदत ठेवी मासिक आणि तिमाही व्याज मिळवतील.
विशेष मुदत ठेवींवर, तुम्हाला मुदतपूर्तीवर व्याज मिळेल.
टीडीएस वगळता व्याज, ग्राहकांच्या खात्यात जमा
या योजनेचा तुम्ही बँक शाखा INB आणि YONO चॅनेल वरून लाभ घेऊ शकता.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker