स्टेट बँकेत ‘हे’ काम करणे गरजेचे अन्यथा थांबतील व्यवहार! घरबसल्याही करू शकता काम

MHLive24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशातील सर्वच बॅंक खातेधारकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बॅंकेने कोरोनाच्या संकटामुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती पाहता केवायसीच्या (KYC)नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने सर्वच बॅंकांना सूचना दिल्या आहेत की केवायसी अपडेट झाले नसल्यास ग्राहकांचे बॅंक खाते ३१ डिसेंबर २०२१ पर्यत बंद करू नये. याशिवाय रिझर्व्ह बॅंकेने १ डिसेंबर २०२१ पर्यत लिमिटेड केवायसीच्या वापराचीही परवानगी दिली आहे. परंतु आता याच पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे महत्वाची बातमी देण्यात आली आहे.

बँकेच्या खातेदारांना त्यांचे खाते KYC अपडेट करणे आवश्यक आहे. केवायसीमध्ये तुम्हाला तुमची कागदपत्रे बँकेकडे जमा करावी लागतील. आता बँकेने त्या लोकांसाठी देखील विशेष व्यवस्था केली आहे, जे बँक शाखेत जाऊ शकत नाहीत. केवायसी करण्यासाठी बँकेत जाणे आवश्यकच आहे असे नाही. आपण हे काम आपल्या घरी बसून देखील करू शकता.

Advertisement

केवायसीचे काम घरी बसून कसे करता येईल का ? :- अलीकडेच एका एसबीआय ग्राहकाने ट्विटरद्वारे बँकेला टॅग केले आणि केवायसीचे काम घरी बसून कसे करता येईल, याची विचारणा केली. यानंतर त्याला एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे उत्तर देखील दिले आणि बँकेचे नियम सांगितले. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत ईमेलद्वारे स्वाक्षरी करून स्कॅन अर्ज आणि केवायसी दस्तऐवज पाठवू शकता किंवा बँक शाखेत पाठवू शकता.

तर तुम्हाला तुमच्या मूळ केवायसी दस्तऐवजांसह बँकेत जावे लागेल :- बँक म्हणते की, जर तुम्हाला पत्ता, फोन नंबर इत्यादींमध्ये काही बदल करायचे असतील किंवा दस्तऐवजात काही बदल असेल तर तुम्हाला तुमच्या मूळ केवायसी दस्तऐवजांसह बँकेत जावे लागेल. तसेच यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊ शकता.

आयडीबीआय बॅंकेची व्हिडिओ केवायसी अपडेशनची सुविधा :- आयडीबीआय बॅंकेने व्ही-केवायसीच्या माध्यमातून केवायसी अपडेशनची सुविधा सुरू केली आहे. आयडीबीआय बॅंकेचे ग्राहक आता बॅंकेच्या वेबसाईटवर उपलब्ध व्ही-सीआयपीलिंकद्वारे आपल्या सोयीनुसार केवायसी कागदपत्रे जमा करू शकतात किंवा केवायसी प्रक्रिया सुरू करू करू शकतात. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे संपर्करहित आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker