आता कार्ड नंबर टाकल्याशिवायच होईल ऑनलाईन पेमेंट; येतोय ‘हा’ नवीन नियम

MHLive24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- आता देशात डिजिटल पेमेंटचा मार्ग बदलणार आहे. डेटा सुरक्षा आणि ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक कार्ड टोकनायझेशन लागू करणार आहे, ज्याची मार्गदर्शक तत्त्वे रिझर्व्ह बँकेने 8 जानेवारी 2019 रोजी जारी केली होती.

‘कार्ड टोकनायझेशन’ काय आहे ते समजून घ्या :- जर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट वरून खरेदी केली असेल आणि पेमेंट करताना फक्त सीव्हीव्ही नंबर एंटर केला असेल तर याचा अर्थ असा की ई-कॉमर्स वेबसाइटवर तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डबद्दल आधीच संपूर्ण माहिती आहे. पण आता ते होणार नाही. ई-कॉमर्स वेबसाइट तुमच्या कार्डाची माहिती साठवू शकत नाहीत. त्याऐवजी, पेमेंट ‘टोकन सिस्टीम’ द्वारे केले जाईल.

सोप्या भाषेत समजून घ्या- टोकनलायझेशनमध्ये तुम्हाला तुमचे कार्ड तपशील एंटर करण्याची गरज नाही, त्याऐवजी ‘टोकन’ नावाचा एक यूनीक ऑल्टरनेट नंबर आहे, जो तुमच्या कार्डाशी जोडलेला आहे. ज्याचा वापर करून तुमचे कार्ड तपशील सुरक्षित राहतात.

Advertisement

याचा अर्थ जेव्हा तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी केल्यानंतर पेमेंट करता, तेव्हा तुम्हाला तुमचा 16 अंकी कार्ड क्रमांक टाकावा लागणार नाही, त्याऐवजी तुम्हाला टोकन क्रमांक टाकावा लागेल.

हे नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू झाले :- प्रत्येक मर्चेंट चा स्वतंत्र टोकन क्रमांक असेल ज्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइटला कार्ड पेमेंट कंपन्यांशी करार करावा लागेल. डेटा सुरक्षेमध्ये ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक कोणतीही सवलत देण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे ऑटो डेबिट पेमेंट फक्त टोकनायझेशनद्वारे केले जाईल. हे नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. म्हणजेच 1 जानेवारीपासून कोणतीही ई-कॉमर्स कंपनी ग्राहकांचे कार्ड तपशील जतन आणि ठेवू शकणार नाही

टोकन इतर कुठेही वापरता येत नाही :- ई-कॉमर्स मर्चंट आणि पेमेंट प्रोव्हायडर दरम्यान जारी केलेले टोकन इतर कोठेही वापरता येणार नाही आणि फसवणुकीची शक्यता बरीच कमी होईल, त्यामुळे पेमेंट प्रक्रिया क्लिष्ट होण्याऐवजी सोपी होईल. टोकन आयडी एक प्रकारे यूपीआय आयडीच्या धर्तीवर असेल, जिथे ग्राहक त्याचे सर्व तपशील जाहीर न करता पेमेंट करण्यास सक्षम असेल. ग्राहकांचे कार्ड या टोकनशी जोडले जातील.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker