अस्सल महाराष्ट्रीयन मराठी माणसाची प्रेरणादायी कथा! एकेकाळी हॉटेलमध्ये कूक म्हणून केले काम, आज जगभरात 450 हॉटेल्स

MHLive24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्राच्या मातीनं अनेक रत्ने घडवलीत. त्यातील अनेकांनी स्वकर्तृत्वानं नामाभिधान मिळवलंय. विठ्ठल कामत हे देखील महाराष्ट्रातील असेच एक व्यक्तिमत्व. विठ्ठल कामत यांच नाव घेताच डोळ्यासमोर उभी रहातात ‘सत्कार’, ‘ऑर्किड’ आणि ‘सम्राट’ सारखी विविध खाद्यसंस्कृतींनी परिपूर्ण अशी उपहारगृह.

विठ्ठल कामत यांचा जन्म मुंबईतील ग्रॅंट रोड येथे वास्तव्यास असणाऱ्या कामत या कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताचीच, परंतु कष्ट करुन पोट भरण्यावर कामत कुटुंबियांचा कल. विठ्ठल कामत यांच्या वडील व्यंकटेश यांचे हॉटेल व्यवसाय होता. विठ्ठल यांच्या आईचेही असेच म्हणणे होते की, विठ्ठलनेही मोठे होऊन वडिलांचा व्यवसाय वाढवावा. परंतु, विठ्ठल कामत यांना हॉटेल व्यवसाय वेगळ्या पद्धतीने मोठा करायचा होता.

आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाचे नाव जगभरात करायचे होते. दरम्यान, विठ्ठल यांनी आपले इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एकदा लंडनमधील एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये काम केले. आता त्यांच्याकडे जगभरात 450 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स आहेत. विठ्ठल कामत यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात.

Advertisement

विठ्ठल कामत यांचा जीवन प्रवास :- विठ्ठल कामत यांचा जन्म मुंबईतील ग्रँट रोड स्टेशनजवळील कामत कुटुंबात झाला. रॉबर्टमनी हायस्कूलमधून शिक्षणानंतर त्यांनी अभियांत्रिकी पदवीही मिळवली. वडील व्यंकटेश यांचे एक छोटे रेस्टॉरंट होते. नोकरी करण्याऐवजी विठ्ठलने वडिलांच्या कामात मदत करावी, अशी आईची इच्छा होती. पण विठ्ठलला पुढे काहीतरी करून दाखवायचे होते, त्यामुळे ते काहीतरी नवीन करण्याचा विचार करीत होते.

अशा परिस्थितीत कोणी तरी फसवणूक करून वडिलांचे रेस्टॉरंट हिसकावले. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आणि नुकसानही झाले. विठ्ठल यांना वाटले की, आता त्यांच्याकडे असलेले दुसरे रेस्टॉरंट हिसकावून घेतलं जाईल, त्यामुळे त्यांनी तिथे वडिलांबरोबर काम करण्यास सुरुवात केली. पालकांनाही विठ्ठल यांचा हा निर्णय आवडला.

व्यवसाय वाढवण्यासाठी कूकचे केले काम :- जेव्हा त्यांचे ‘सत्कार’ रेस्टॉरंट चांगले चालू लागले, तेव्हा विठ्ठल यांनी वडिलांना व्यवसाय वाढवण्याचा आपला हेतू सांगितला. वडिलांनीही होकार दिला. यानंतर विठ्ठल यांनी परदेश प्रवास करण्याचा आणि हॉटेल व्यवसायाबद्दल शक्य तितकी माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून प्रति आठवडा 75 पौंडची नोकरी घेतली. या रेस्टॉरंटमधून पैसे कमावले, अनेक देशांचा प्रवास केला आणि हॉटेल व्यवसायाचे बारकावे शिकले.

Advertisement

भारतातील पहिले इको टेल पंचतारांकित हॉटेल बांधले :- हॉटेल एकट्याने कधीच चालत नाही. टीमवर्कचे चांगले उदाहरण म्हणजे हॉटेलिंग व्यवसाय. मुख्य शेफ, त्याच्या खाली काम करणारे कूक ते हॉटेलमध्ये साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला कसे सांभाळणे, टीम कशी उभी करणे, मुख्य म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे धडे कॉलेजमध्ये न घेता विठ्ठल कामत यांनी देश-विदेशातील हॉटेल्समध्ये काम करुन ते शिकले आणि या सर्व अनुभवानिशी पुन्हा भारतात आले आणि आपला वडिलोपार्जित व्यवसाय वाढविण्याकरीता कामाला लागले.

भारतात येऊन विठ्ठल कामत यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय सुरु केला. त्यांना हा बिझनेस मोठा करायचा होता. त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरु केले. दरम्यान त्यांन कळाले की सांताक्रुझ एअरपोर्ट नजीकचे ‘प्लाझ्मा’ हॉटेल विकायला काढले आहे. विठ्ठल कामत यांनी त्यात रस दाखविला. परंतु, हे हॉटेल विकत घेण्याइतपत आर्थिक भांडवल त्यांच्याकडे नव्हते.

तेव्हा त्यांनी आर्थिक जमवाजमव करुन हे हॉटेल खरेदी केले. त्याच जागेवर देशातील पहिले इको-टेल फाईव्ह स्टार हॉटेल्स सुरु केले आणि हॉटेलचे नाव ‘ऑर्किड’ असे ठेवले. याच व्यवहारानंतर विठ्ठल कामत यांचे मोठे हॉटेल उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले. याच दरम्यान एक साधारण मुंबईकरही हॉटेल व्यवसाय सुरु करु शकतो, हे साऱ्यांना कळून चुकले आणि विठ्ठल कामत प्रसिद्ध झाले.

Advertisement

देशात आणि परदेशात 450 हून अधिक रेस्टॉरंट उघडली :- भारताचे पहिले इको टेल पंचतारांकित हॉटेल बांधल्यानंतर विठ्ठल कामत यांनी परदेशात व्यवसायाचा विस्तार केला. जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या विठ्ठल कामत रेस्टॉरंट्सच्या फ्रँचायझी आहेत. त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांची हॉटेल्सही आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker