स्टेट बॅंक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; तुमच्या सिम कार्ड संदर्भात त्वरित करा ‘हे’ काम

MHLive24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीआय त्यांचा डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म योनो अ‍ॅपचे पुढील व्हर्जन आणण्याच्या विचारात आहे. त्या दृष्टीने बँकेचे काम देखील सुरू आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश खारा यांनी याबाबत माहिती दिली आहे. बँक विविध गोष्टींवर कार्य करत असते. त्यातून ते नवनवीन सुविधा देण्याचेही कार्य करते.

परंतु हे सर्व करत असताना ते सुरक्षिततेवरदेखील भर देते. याच पार्श्वभूमीवर SBI ने ग्राहकांच्या खात्यांसाठी YONO आणि YONO Lite अॅप, सिम बायंडिंगमध्ये सुरक्षेची एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. योनो आणि योनो लाईट अॅपवर सिम बंधनकारक करण्याची प्रणाली केवळ त्या मोबाईलवर काम करेल, ज्यांचे सिम कार्ड बँकेने पडताळणी केले आहे.

ज्या ग्राहकांना YONO आणि YONA Lite ची नवीन अपडेट घ्यायचे आहे, त्या मोबाईल धारकांना बँकेकडे नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या नवीन सिस्टीममध्ये ग्राहकाला बँकेकडे आधीच नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या सिमची पडताळणी करावी लागेल.

Advertisement

ग्राहकांनी ठरवायचे आहे की त्यांनी त्याच मोबाईल फोनचे सिम रजिस्टर करावे जे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी जोडलेले आहे. सिम कार्डची पडताळणी केल्यानंतर YONO आणि YONO लाईट अॅपवर सायबर फसवणूक टाळण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध होतील. ग्राहकांची बँकिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता स्टेट बँकेने ही नवीन प्रणाली सुरू केली आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker