वोडाफोन-आयडिया बंद झाले तर मोदी सरकारचे होईल सर्वात जास्त नुकसान; कसे ? वाचा…

MHLive24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- भारताची तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेड बुडण्याच्या धोक्यात आहे. व्होडाफोन-आयडिया बुडल्यामुळे सरकारला सर्वाधिक त्रास होणार आहे. सध्या व्होडाफोन-आयडियाकडे केंद्र सरकारचे 1.6 लाख कोटी रुपये थकीत आहेत. स्पेक्ट्रम पेमेंट आणि AGR थकबाकीच्या बाबतीत, ही रक्कम थकबाकी आहे. जर भारी कर्जाशी झुंज देणारी vodafone-idea , कोणत्याही कारणामुळे दिवाळखोरीत गेली, तर सरकारला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागू शकतो.

वोडाफोनची वाईट स्थिती :- व्होडाफोन आयडिया गेल्या 10 महिन्यांपासून 25 हजार कोटी जमा करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याचे हात अजूनही रिकामे आहेत. Joint Venture मध्ये 44.39 टक्के हिस्सेदारी असणारे वोडाफोन ग्रुप आणि 27.66 टक्के हिस्सेदारी असणारे एबीजी ने अधिक पैसे गुंतवण्यास नकार दिला आहे. VIआता दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. आदित्य बिर्ला यांनी म्हटले आहे की, वोडाफोन आयडियामधील आपला हिस्सा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला किंवा देशांतर्गत वित्तीय संस्थेला देण्यास तयार आहे.

देशातील 8 मोठ्या बँकाही प्रभावित होणार :- व्होडाफोन आयडियाच्या अडचणी वाढल्याने एसबीआयसह देशातील 8 मोठ्या बँकाही प्रभावित होऊ शकतात. कंपनीवर 1.80 लाख कोटींचे कर्ज आहे, जे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे घेतले आहे. त्यात बँकांचा एक्सपोजर देखील समाविष्ट आहे. जर वोडाफोन आयडिया बंद झाली, तर या बँकांची मोठी रक्कम देखील डिफॉल्ट होऊ शकते.

Advertisement

28 कोटी ग्राहकही प्रभावित :- जर व्होडाफोन आयडिया बंद झाली, तर त्याचा परिणाम देशातील मोठ्या मोबाईल ग्राहकांवरही दिसून येईल. व्होडाफोन आयडियाचे ग्राहक संख्या 28 कोटींच्या घरात आहेत. जर कंपनीच बंद झाली तर तर या ग्राहकांची संख्या बंद होणे स्वाभाविक आहे. विशेषतः Jio, Airtel यांसारख्या इतर कंपन्यांना याचा लाभ नक्कीच मिळू शकतो. कारण त्यांना या मोठ्या ग्राहक बेसचे भांडवल करायचे आहे.

बंदची चर्चा का? :- कंपनीच्या डोक्यावर मोठं कर्जाचं डोंगर आहे. ते दररोज वाढत चाललंय. कंपनीचा पाय खोलात असल्याने कोणी गुंतवणूक करण्यास तयार नाही. त्यामुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे चेयरमन यांनी सरकारला आपल्या कंपनीतील आपला हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला. पण सरकारकडून कंपनीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

कंपनीच्या चेयरमनने राजीनामा दिल्याने कंपनी बंदच होणार, असे तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान व्होडाफोन इंडियाचे सीईओनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. आपली कंपनी बंद होणार नाही, असा विश्वास त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलाय. पण आकडे दुसरंच काही सांगतायेत.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker