‘ह्या’ स्मार्टफोनची जबरदस्त ऑफर! स्क्रीन फुटली तर मोफत बदलून मिळणार अन सोबत 10000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स

MHLive24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- Vivo ने आपल्या युजर्ससाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. कंपनी अशा ऑफर्स नेहमी देत राहते. यावेळी Vivo तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत लाभ देत आहे. तसेच, जर तुमच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले तुटलेला असेल तर तुम्ही तो मोफत बदलू शकता. या ऑफर्स 11 ऑगस्टपासून सुरू झाल्या आहेत आणि 23 ऑगस्टपर्यंत चालू राहतील. या दरम्यान, वापरकर्त्यांना अमेझॉन -फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साइटवरून नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.

Display विनामूल्य बदला :- कंपनीच्या या ऑफर्स Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीज वर लागू आहेत. यावर त्यांना कार्ड ऑफर, ईएमआय ऑफर, वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, मोफत लॅपटॉप बॅकपॅक, एक्सेटेंडेड वॉरंटी यासारख्या उत्तम ऑफर मिळतील.

वन टाइम Screen Replacement सह कॅशबॅकदेखील मिळणार :- या ऑफर अंतर्गत, जर तुम्ही Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजचे स्मार्टफोन खरेदी केले तर तुम्हाला वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा 6 महिन्यांसाठी उपलब्ध असेल. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह हे स्मार्टफोन खरेदी केल्यावर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

Advertisement

याशिवाय, बजाज फिनसर्व ट्रिपल झिरो ईएमआय योजनेअंतर्गत तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. तसेच, तुम्ही हे स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआयवरदेखील खरेदी करू शकता आणि 10 हजार रुपयांच्या जिओ बेनिफिट्सचा लाभदेखील घेऊ शकता.

6 महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी आणि अश्योर्ड गिफ्टची सुविधा :- या व्यतिरिक्त, कंपनी या ऑफर अंतर्गत स्मार्टफोन खरेदीवर एक अश्योर्ड गिफ्ट देखील देत आहे, ज्यामध्ये आपण मोफत बॅकपॅक मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला 15,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रोडक्ट खरेदी करावे लागेल.

दुसरीकडे, जर तुम्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्रोडक्ट खरेदी केले तर तुम्हाला 6 महिन्यांच्या एक्सटेंडेड वॉरंटीचा लाभ मिळेल. यामध्ये 25 ऑगस्टपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी ऑफरचा लाभ घेता येईल. या सर्व ऑफर मेन लाइन चॅनेलद्वारे उपलब्ध केल्या जात आहेत.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker