जबरदस्त ! टाटा टिगोरचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च; फुल चार्जवर जाईल 306 किमी पर्यंत, कमी किमतीत जबरदस्त फीचर्स

MHLive24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- सणासुदीच्या अगोदर टाटा मोटर्सने टाटा टिगोरची इलेक्ट्रिक आवृत्ती (टाटा टिगॉर ईव्ही) लाँच केली आहे. कंपनीने बाजारात त्याची सुरुवात 11.99 लाख रुपयांसह केली आहे. टाटा टिगोर इलेक्ट्रिक तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. या वाहनाची किंमत आणि उत्तम वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात 

सर्वोत्तम सेफ्टी फीचर्स :- नवीन टाटा टिगोर ईव्हीमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स मिळतील. यात हिल एसेन्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्स, एबीएस विथ ईबीडी सीएससी अर्थात कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल अशी वैशिष्ट्ये मिळतील. याशिवाय, कार IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि मोटरसह सुसज्ज असेल.

टाटा मोटर्सचा दावा आहे की नवीन Tigor EV आता देशातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक सेडान असेल. टाटा मोटर्सने 2017 मध्ये भारतातील इलेक्ट्रिक कार बाजारात प्रवेश केला. भारतीय रस्त्यांवर आज 8500 हून अधिक इलेक्ट्रिक वाहने आहेत. यापैकी 6000 हून अधिक नेक्सॉन ईव्ही आहेत.

Advertisement

टाटा टिगोर EV चे फास्ट चार्जर :- नवीन टाटा टिगॉर ईव्ही फास्ट चार्जरद्वारे 1 तासात 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. दुसरीकडे, नियमित चार्ज मध्ये म्हणजे होम चार्जिंग मध्ये ते सुमारे 8.5 तासांमध्ये 0 ते 80 टक्के चार्ज होईल. ही कार 15A च्या सॉकेटने चार्ज केली जाऊ शकते. जे आपल्या घरात आणि कार्यालयात सहज उपलब्ध आहेत.

टाटाच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 55kW इलेक्ट्रिक मोटर आणि 26kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक असेल, जे 74bhp (55kW) आणि 170Nm पर्यंत टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. टाटा मोटर्स या कार वर 8 वर्षांची आणि 1,60,000 किमी पर्यंत बॅटरी वॉरंटी देईल.

सर्वोत्तम इलेक्ट्रिक वाहन :- टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाईटनुसार, भारतातील टाटा टिगोर ची इलेक्ट्रिक वर्जन एका पूर्ण चार्जवर 306 किमी पर्यंत प्रवास करू शकते. ही कारची ARAI-certified रेंज आहे. सध्या इतके मायलेज इतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये उपलब्ध नाही.

Advertisement

11.99 लाख सुरवातीची किंमत :- टाटा मोटर्सच्या मते, नवीन टाटा टिगोर ईव्ही तीन वेरिएंट मध्ये उपलब्ध असेल. यामध्ये टाटा टिगोर EV XE ची किंमत 11.99 लाख रुपये, टाटा टिगोर EV XM ची किंमत 12.49 लाख रुपये आणि टाटा टिगोर EV XZ+ ची किंमत 12.99 लाख रुपये असेल.

टाटा टिगोर ईव्ही :- अपडेटेड Tigor EV Ziptron तंत्रज्ञानासह येईल. Ziptrop तंत्रज्ञानावर आधारित Nexon EV नंतर टाटा मोटर्सची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. 26 Kw लिथियम ऑईल बॅटरी पॅकसह सुसज्ज, ही इलेक्ट्रिक कार फक्त 5.7 सेकंदात 0.60 किमी प्रति तास वेग पकडेल.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker