खुशखबर! सेवानिवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार: जाणून घ्या सरकारचे प्लॅनिंग

MHLive24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- कर्मचाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते. खरं तर, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने एक सूचना जारी केली आहे, ज्यात असे सांगण्यात आले आहे की देशात काम करण्यासाठी लोकांची वयोमर्यादा वाढवली पाहिजे. यासोबतच, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी.

ज्येष्ठ नागरिक सुरक्षा :- अहवालानुसार, या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावी. आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे.

कौशल्य विकास देखील महत्वाचे आहे :- या अहवालानुसार, कार्यरत वय लोकसंख्या वाढवायची असल्यास निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत गरज आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केले जाऊ शकते. या अहवालात 50 वर्षांवरील व्यक्तींच्या कौशल्य विकासाबद्दलही सांगितले आहे.

Advertisement

सरकारने धोरण बनवावे :- केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत जेणेकरून कौशल्य विकास करता येईल, असे अहवालात म्हटले आहे. या प्रयत्नात असंघटित क्षेत्र, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित लोकांनाही सामील करावे कि ज्यांकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही, पण त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे.

वर्ल्ड पॉपुलेशन प्रोस्पेक्टस 2019 चा रिपोर्ट :- हे लक्षात घेण्यासारखे आहे की जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2019 नुसार 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. म्हणजेच देशाची सुमारे 19.5 टक्के लोकसंख्या सेवानिवृत्तीच्या कॅटेगिरीत जाईल. वर्ष 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 10 टक्के किंवा 14 करोड़ लोक ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगिरीत आहेत.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker