बाबा रामदेव यांना टक्कर देणाऱ्या गौतम अदानी यांच्या कंपनीला मोठा धक्का, झालेय ‘असे’ काही

MHLive24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- बाजार नियामक सेबीने देशातील ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा धक्का दिला आहे. सेबीने अदानी समूहाच्या अदानी विल्मर कंपनीचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) तात्पुरते स्थगित केले आहे. अदानी एंटरप्रायझेसविरुद्ध तपास सुरू असल्याने सेबीने ही कारवाई केली आहे. ही तपासणी थेट विदेशी गुंतवणुकीसंदर्भात सुरू आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, कृषी कमोडिटी कंपनी अदानी विल्मरचा IPO स्थगित वर्गात ठेवण्यात आला आहे. अदानी विल्मर 4500 कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ लाँच करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनीने अलीकडेच सेबीकडे अर्ज केला होता. अदानी विल्मर ही अदानी समूहाची उपकंपनी आहे, जी पोर्ट ते एनर्जी पर्यंत काम करते.

अदानी एंटरप्रायझेसचा अदानी विल्मरमध्ये 50 टक्के हिस्सा आहे: या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, अदानी एंटरप्रायजेसविरोधात प्रलंबित तपास या कारणामुळे सेबीने अदानी विल्मरच्या आयपीओला स्थगिती दिली आहे. अदानी विल्मारमध्ये अदानी एंटरप्रायझेसची 50 टक्के हिस्सेदारी आहे. अदानी विल्मर लोकप्रिय खाद्यतेल ब्रँड फॉर्च्यून ची विक्री करतो. अदानी विल्मरमधील उर्वरित 50 टक्के भाग सिंगापूरस्थित विल्मरकडे आहे. अदानी विल्मर ही अदानी समूह आणि विल्मक यांची संयुक्त कंपनी आहे.

Advertisement

यामुळे बंदी घालण्यात आली: पॉलिसी नुसार, जर कंपनीची सेबीच्या कोणत्याही विभागाकडून चौकशी केली जात असेल आणि त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही संस्था आयपीओसाठी अर्ज करत असेल तर त्याला 90 दिवसांसाठी मान्यता मिळणार नाही. यात आणखी 45 दिवसांचा विलंब होऊ शकतो. त्याचवेळी, अदानी समूहाचे म्हणणे आहे की त्यांना या संदर्भात सेबीकडून कोणतीही औपचारिक माहिती प्राप्त झालेली नाही.

अदानी ग्रुपचे म्हणणे आहे की थेट विदेशी गुंतवणुकीशी आमचा काहीही संबंध नाही. हा मुद्दा वारंवार मांडला जात आहे. या मुद्द्याद्वारे पुन्हा एकदा गुंतवणूकदार समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परदेशी थेट गुंतवणूकदार देखील अदानी समूहाच्या इतर गुंतवणूकदारांच्या बरोबरीने आहेत.

मॉरिशसच्या गुंतवणूकदारांची चौकशी सुरू : सेबी अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसशी संबंधित मॉरिशस गुंतवणूकदारांची चौकशी करत आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सेबीला मॉरीशस नियामककडून अद्याप या तपासणीसंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. यापूर्वी जूनमध्ये सेबीने कमी किमतीच्या विमान कंपनी गोफर्स्टच्या आयपीओवरही बंदी घातली होती. कंपनीचे प्रमोटर वाडिया आणि बॉम्बे डाईंग यांच्या विरोधात प्रलंबित तपासांमुळे ही बंदी लागू करण्यात आली.

Advertisement

बाबा रामदेव यांच्या कंपनीशी स्पर्धा: अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मर कंपनीची योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया यांच्याशी थेट स्पर्धा आहे. बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेदने गेल्या वर्षी दिवाळखोरी प्रक्रियेदरम्यान रुची सोया खरेदी केली होती. अदानी विल्मरला मात देऊनच पतंजलीने रुची सोया खरेदी केली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker