सिलेंडर भरताना गॅस एजन्सी जास्त पैसे घेते का? ‘येथे’ करा तक्रार, लगेच लागेल निकाल

MHLive24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सध्या नागरिक महागाईचा सामना करत आहेत. अनेक गोष्टींमध्ये भाववाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. या सर्वसामान्यांना कायम लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत.

यात भर म्हणून की काय काही गॅस एजन्सीजकडून सिलिंडरसाठी जादा पैसे आकारून ग्राहकांना लुबाडले जात आहे. घरगुती सिलिंडरसाठी तुमच्याकडून ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही त्याविरोधात तक्रार नोंदवू शकता.

पाठीमागे एकदा शहरात व जिल्ह्य़ात ठिकठिकाणी गॅस एजन्सीजचे संचालक व मालक ग्राहकांना त्रास देतात, मनमानी करतात, लवकर सिलिंडर देत नाहीत, जास्तीचे पैसे उकळतात, असे नेहमीच आरोप होतात. त्यात सत्यही असते, पण हे माहिती असूनही गॅस ग्राहक ग्राहक पंचायतकडे धाव घेत नाहीत व न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नही करीत नाहीत, अशी खंत ग्राहक पंचायतने व्यक्त केली होती.

Advertisement

सध्याच्या काळात असे दिसते की, काही गॅस एजन्सीजकडून सिलिंडरसाठी जादा पैसे आकारून ग्राहकांना लुबाडले जात आहे. घरगुती सिलिंडरसाठी तुमच्याकडून ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही त्याविरोधात तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक ट्विट करावे लागेल. त्यानंतर MoPNG e-Seva या सरकारी विभागाकडून संबंधित एजन्सीवर योग्य ती कारवाई केली जाईल.

तसेच तुम्ही एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर घरी पोहोचवला जात नसल्यास एजन्सी लगेच बदलू शकता. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, खादा ग्राहक त्यांच्या गॅस एजन्सीकडून देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जाविषयी समाधानी नसेल तर तो दुसऱ्या गॅस एजन्सीत कनेक्शन ट्रान्सफर करु शकतो.

सुरुवातीच्या काळात ही सुविधा फक्त एकदाच वापरता येईल. ज्याप्रमाणे रेशन कार्डधारकाला त्याचे दुकान किंवा डिलर बदलण्याची सुविधा आहे, तसेच या सुविधेचे स्वरुप आहे.

Advertisement

ही सुविधा सुरुवातीला चंदीगड, पुणे, कोईम्बतूर आणि गुडगावमध्ये सुरु केली जाईल. त्यानंतर टप्याटप्प्याने देशभरात ही सुविधा मिळेल.

जर तुमचा गॅस रेग्युलेटर एखाद्या कारणामुळे खराब झाला असेल तर गॅस एजन्सी तोही बदलून देते. परंतु, यासाठी एजन्सी कंपनीच्या टेरिफप्रमाणे तुमच्याकडून ठराविक रक्कम जमा करुन घेते. ही रक्कम 150 रुपयांपर्यंत असू शकते.

जर तुमचा रेग्युलेटर चोरीला गेला आणि तुम्हाला एजन्सीकडून नवीन रेग्युलेटर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पोलिसांत एफआयआर दाखल करावा लागेल. एफआयआरची पत जमा केल्यानंतर एजन्सी तुम्हाला रेग्युलेटर बदलून देईल.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker